Lok Sabha Election : शेवटी खरगे यांच्या मतदारसंघासाठी उमेदवार सापडला!

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून भाजपा आणि कॉंग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

124
Lok Sabha Election : शेवटी खरगे यांच्या मतदारसंघासाठी उमेदवार सापडला!

इंडी या तथाकथित आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुध्दा पराभवाच्या भीतीमुळे लोकसभेची निवडणूक लढणे टाळले आहे. गुलबर्गा हा खरगे यांचा मतदारसंघ. २००९ आणि २०१४ मध्ये गुलबर्गामधून विजयी झालेले खरगे यांना २०१९ मध्ये पराभवाचे तोंड बघावे लागले होते. भाजपाची पाळेमुळे एवढी रूजली आहे की खरगेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनीही निवडणुकीपासून अंग चोरले आहे. (Lok Sabha Election)

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून भाजपा आणि कॉंग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – BMC : गगराणी सकाळी ९ वाजल्यापासून तर बांगर आठवड्याचे सातही दिवस करणार काम)

कॉंग्रेसला पराभवाची भीती

मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या मनात पराभवाची भीती दाटून भरली आहे. ही भीती केवळ कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या मनात भरली आहे असे नव्हे तर दस्तुरखुद्य पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी यावेळेस आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. (Lok Sabha Election)

खरगे यांच्याकडून गुलबर्गाला रामराम

कर्नाटकचा गुलबर्गा हा कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पारंपारिक मतदारसंघ. २००९ आणि २०१४ या दोन्ही वेळी खरगे यांनी येथून निवडणूक जिंकली होती. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवाची भीती एवढी घट्ट झाली आहे की २०२४ ची निवडणूक येथून लढण्यास त्यांनी नकार दिला आहे. (Lok Sabha Election)

गुलबर्गामधून कॉंग्रेसला उमेदवार सापडेना?

खरगे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर गुलबर्गामधून कुणाला उतरवायचे? हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाला पडला होता. यासाठी उमेदवारांचा शोध घेणे सुरू झाले. परंतु, गुलबर्गामधून निवडणूक लढण्याची विचारणा होताच प्रत्येकाने आपले कान पकडले. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची चौथी यादी जाहीर, कोणाला मिळाले तिकीट? वाचा सविस्तर…)

मुलगा प्रियांक खरगे यानेही रस दाखविला नाही

कॉंग्रेसच्या अन्य उमेदवारांचे तर सोडाच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या चिरंजीवांनी सुध्दा गुलबर्गामधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. प्रियांक खरगे हे सध्या गुलबर्गा अंतर्गत येणाऱ्या चित्तापूरमधून कॉंग्रेसचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर तर ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र त्यांनीसुध्दा लोकसभेची निवडणूक लढण्याच्या नावावर हात जोडले. (Lok Sabha Election)

नाईलाजापोटी जावयांना उमेदवार बनविले

गुलबर्गामधून कुणीही लढण्यास तयार होत नसल्यामुळे कॉंग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला होता. असंख्य नेत्यांना विचारल्यानंतरही पदरात केवळ नकारच पडत होता. शेवटी मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना गुलबर्गा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Arvind Kejriwal तुरुंगातून सरकार चालवू शकतात का? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ?)

काँग्रेस काय म्हणाली?

खरगे यांना तिकीट न दिल्याबद्दल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, खरगे यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यांना निवडणुकीचे व्यवस्थापन करायचे आहे. राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे कामकाज सांभाळण्याव्यतिरिक्त इंडी आघाडीच्या मित्रपक्षांशी समन्वय साधावा लागेल. तसेच त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ अजून संपलेला नाही. (Lok Sabha Election)

जावयांना सुध्दा निवडणूक लढवायची नव्हती

दोड्डामणी हे व्यावसायिक असून ते शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापनही करतात. सुरुवातीला ते निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. पण अखेर त्यांनी पक्षाशी सहमती दर्शवल्याचे बोलले जाते. कलबुर्गी येथे जन्मलेल्या दोड्डामणी यांचे राहणीमान साधे राहिले आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.