Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची चौथी यादी जाहीर, कोणाला मिळाले तिकीट? वाचा सविस्तर…

294
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची चौथी यादी जाहीर, कोणाला मिळाले तिकीट? वाचा सविस्तर...

भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी शुक्रवारी जाहीर केली. एक दिवस आधी तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. चौथ्या यादीमध्ये पुद्दुचेरीतील एका जागेसाठी आणि तामिळनाडूमधील १४ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

तामिळनाडूतील ९ उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली होती. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून तिकिट देण्यात आले आहे. प्रदेश भाजपाचे प्रमुख के. अण्णामलाई कोईम्बतूरमधून, तर केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना निलगिरीतून उमेदवारी देण्यात आली.


(हेही वाचा –सांगलीतील UBT उमेदवाराची घोषणा राहुल गांधींच्या सहमतीनेच; संजय राऊत काय म्हणाले ? )

तामिळनाडू लोकसभेच्या एकूण ३९ जागा आहेत. त्यापैकी भाजपाने पट्टाली मक्कल काची (पीएमके)ला १० जागा दिल्या आहेत. अशा प्रकारे राज्यातील ६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. भाजपाने गुरुवारी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तेजू मतदारसंघातून मोहेश चाय यांना उमेदवार म्हणून घोषित केले.

तामिळनाडू             उमेदवारांची नावे

तिरुवल्लुवर             पीव्ही बालगणपती
चेन्नई उत्तर          आर. सी. पॉल कनगराज
तिरुवन्नमलाई          अ. अस्वथामन
नमक्कल              केपी. रामलिंगम
तिरूपूर                एपी. मुरुगानंदम
पोल्लाची            सी. वसंतराजन
करूर              व्ही. सेंथिलीनाथन
चिदंबरम          पु. कार्तियायिनी
नागपट्टणम        एसजीएम रमेश
तंजावर           एम. मुरुगानंदम
शिवगंगाई          देवनाथन यादव
मदुराई            रामा श्रीनिवासन
विरधुनगर          राधिका सरथकुमार
तेनकशी           बी. जॉन पांडियन
पुद्दुचेरी          ए. नमस्वयम्

पहिल्या यादीत १९५ उमेदवार…
भाजपाने २ मार्चला पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नावे होती, तर १३ मार्चला जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत ७२ नावे होती. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल आणि हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांना तिकीट देण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.