Indian Railways : रेल्वेला ‘कॅन्सल’ तिकिटांमधून तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

134
Indian Railway : उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वेच्या अतिरिक्त ९१११ फेऱ्या

माल वाहतूक आणि तिकिटांच्या विक्रीसोबतच प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकीटांच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला (Indian Railways) 1229 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरटीआय अंतर्गत प्राप्त आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रवाशांकडून रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटांवर रेल्वे कॅन्सलेशन शुल्क (Cancelled Railway Tickets) आकारते. त्यातून रेल्वेला हा पैसा रेल्वेला मिळाला आहे.

(हेही वाचा – NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)

कॅन्सल वेटिंग लिस्टच्या तिकिटाद्वारे उत्पन्न वाढते

मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ता विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या एका माहिती अधिकार अर्जावर रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 2024 या कालावधीत कॅन्सल वेटिंग लिस्टच्या तिकिटाद्वारे रेल्वेला 1229 कोटी रुपये मिळाले. याद्वारे मिळणारे उत्पन्न दरवर्षी वाढत चालले आहे. प्रवासी सोयीसाठी तिकिटे रद्द करतात, परंतु यातून रेल्वेचा फायदा होतो.

दिवाळीच्या सप्ताहात 96.18 लाख तिकिटे रद्द

गेल्या वर्षी 5 ते 17 नोव्हेंबर 2023 या दिवाळीच्या सप्ताहात 96.18 लाख तिकिटे रद्द करण्यात आली. त्यातून रेल्वेला 10.37 कोटी रुपये मिळाले. या काळात मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. आरएसी/वेटिंग लिस्टचे तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला 60 रुपये शुल्क लागते. एसी फर्स्ट क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी सर्वाधिक 240 रुपये शुल्क लागते. भारतीय रेल्वेला 2021 मध्ये तिकीटे रद्द झाल्यामुळे 242. 68 कोटी रुपये मिळाले होते. 2022 मध्ये 439 कोटी आणि 2023 मध्ये 505 कोटी रुपयांची कमाई झाली. तर 2024 मध्ये अवघ्या 2 महिन्यात रेल्वेने कॅन्सल तिकीटांच्या माध्यमातून 43 कोटी रुपयांची कमाई केलीय. (Indian Railways)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.