Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारे म्हणतात, जागा भाजपाची, मी कमळावर लढवायला तयार, अन्यथा अपक्ष लढवणार

माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे म्हणाले.

116
 बारामती लोकसभा निवडणुकीचा (Baramati Lok Sabha Constituency) वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी शिवतारे यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु विजय शिवतारे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आता नवीन भूमिका मांडली आहे, त्यामुळे महायुतीतील नेत्यांची गोची झाली आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे? 

अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक (Baramati Lok Sabha Constituency) लढवणारच. मी शंभुराज देसाई यांना माझी भूमिका सांगितली आहे. ते माझे म्हणणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मी एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी म्हटले की, महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक (Baramati Lok Sabha Constituency) जिंकून दाखवेन. परंतु, त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी बारामतीची जागा शिवसेनेसाठी मागून घेण्याविषयी असमर्थता व्यक्त केली होती. आपल्याला युतीधर्माचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना सांगितले होते. ही जागा भाजपाची आहे. मी कमळाच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहे, अन्यथा अपक्ष लढवणार आहे, असेही शिवतारे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.