CIBIL Score : दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहिलात तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो का?

सिबिल स्कोअरविषयी काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. 

613
CIBIL Score : तुमची नोकरीही ठरवते तुमचा सिबिल स्कोअर?
  • ऋजुता लुकतुके

तुम्ही दुसऱ्याने घेतलेल्या कर्जासाठी जामीन राहिलात तर तुमचाही सिबिल स्कोअर (CIBIL Score) खराब होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे प्राथमिक कर्जदाराने हफ्ते वेळेवर भरले नाहीत आणि कर्ज बुडित निघालं तर नक्कीच तुमच्यावरही त्याचा परिणाम होतो. आता हा मुद्दा विस्ताराने समजून घेऊया. (CIBIL Score)

तुम्ही जामीन राहता याचा अर्थ तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत कर्जदाराऐवजी त्याचे हफ्ते भरणार असा होतो. त्यामुळे कर्ज देणारी बँक तुम्हाला कर्ज घेणारी व्यक्ती म्हणूनच बघते. आणि त्यामुळे कर्ज घेणाऱ्याने हफ्ते चुकवून कर्ज बुडित निघालं तर जामीन राहिलेल्यांवरही त्याचा विपरित परिणाम होतो. (CIBIL Score)

(हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत)

याचा गोष्टीचा परिणाम होतो सिबिल स्कोअरवर

तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाचं प्रमाणही कमी होऊ शकतं. कारण, तुम्ही जामीन राहता त्या कर्जाच्या रकमेची हमी तुम्ही कायदेशीररित्या दिलेली असते. त्यामुळे कर्जाची रक्कम ही तुमचं दायित्व म्हणून बँक धरत असते. आणि त्यातच कर्जाचे हफ्ते कर्जदाराने चुकवले तर बँक तुमच्यावर हा कर्जाचा भार टाकते. त्यामुळे जर पुढे तुम्हाला कर्जाची गरज पडली, तर तुमच्या नावावर जामीन राहिलेल्या कर्जाची रक्कम जमा झाल्यामुळे तुम्हाला स्वत:ला कर्जाची रक्कम कमी मिळू शकते. हा सगळ्यात मोठा तोटा जामीन राहिलेल्या व्यक्तीला सहन करावा लागतो. (CIBIL Score)

त्यातच, कर्ज घेणाऱ्याने हफ्ते थकवले तर जामीन राहिलेल्या व्यक्तीचं परतफेडीचं दायित्व असतं. आणि त्या व्यक्तीने हफ्ते थकवले तर याचा खूप मोठा परिणाम तुमची कर्ज घेण्याची क्षमता आणि सिबिल स्कोअरवर (CIBIL Score) होतो. तुम्हीही हफ्ते चुकवलेत तर तुमच्या विरुद्ध सरकारी क्रेडिट एजन्सी कारवाईही करू शकतात. सिबिल ही त्यातलीच एक संस्था आहे. (CIBIL Score)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.