Mrinal Sen : १८ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे बंगाली चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार – मृणल सेन

मृणल सेन हे कान्स चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव आणि बर्लिनल चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत.

142
Mrinal Sen : १८ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे बंगाली चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार - मृणल सेन

मृणल सेन (Mrinal Sen) हे भारतीय चित्रपट सृष्टीतले पटकथा लेखक, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. मुख्यतः ते बंगाली चित्रपट सृष्टीमध्ये काम करायचे. त्याव्यतिरिक्त त्यांनी हिंदी आणि तेलगू चित्रपट सृष्टीतही बरीच कामं केली आहेत. मृणल सेन हे आपल्या कार्यकाळातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. त्यांनी पूर्व भारतातल्या ‘न्यू वेव्ह’ नावाच्या चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता. त्या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. (Mrinal Sen)

मृणल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी बंगालमध्ये झाला. त्यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी अठरा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त त्यांना कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार दिले गेले. (Mrinal Sen)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल)

या महोत्सवात मृणल सेन यांना मिळाले पुरस्कार 

फ्रान्सच्या सरकारडून त्यांना ‘ओरद्रे देस आर्ट्स एत देस लेटर्स’ हा सन्मान पुरस्कार दिला गेला. तर रशियन सरकारकडून त्यांना ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ हा सन्मान देण्यात आला होता. मृणल सेन (Mrinal Sen) यांचा चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊनही सन्मान करण्यात आला होता. (Mrinal Sen)

मृणल सेन (Mrinal Sen) हे कान्स चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव आणि बर्लिनल चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. वयाच्या ९५ व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. (Mrinal Sen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.