Ghatkopar Hoarding Collapse : भुजबळ यांची वेगळी चूल?

ओबीसी समाजाची वेगळी चूल मांडून राजकारणात नवा अध्याय सुरू करण्याच्या विचारात भुजबळ आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

165
Ghatkopar Hoarding Collapse : भुजबळ यांची वेगळी चूल?

घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी भाजपाकडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात येत असताना महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना ‘क्लीन-चिट’ देत महाविकास आघाडीची भाषा सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ओबीसी समाजाची वेगळी चूल मांडून राजकारणात नवा अध्याय सुरू करण्याच्या विचारात भुजबळ आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Ghatkopar Hoarding Collapse)

भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू

भाजपा आमदार राम कदम तसेच नीलेश राणे, किरीट सोमैया यांनी घाटकोपर होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो समाजमाध्यमांवर शेयर करीत ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तर महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी मात्र थेट ठाकरे यांची बाजू उचलून धरत त्यांचा या प्रकरणाची काय संबंध? असा प्रश्न केला. (Ghatkopar Hoarding Collapse)

राजकारण करू नये

भुजबळ म्हणाले, “राज्यात सरकार आमचे आहे, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात आहे म्हणजे सरकरच्या. उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणाशी काय संबंध?” होर्डिंग मालक भिंडे यांच्या ठाकरे यांच्यासोबतच्या फोटोबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, असे अनेकजण, व्यापारी पुष्पगुच्छ, मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. या विषयाचे राजकारण करू नये, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले. (Ghatkopar Hoarding Collapse)

(हेही वाचा – Maharashtra legislative Council ची निवडणूक पुढे ढकलली; नवी तारीख कधी जाहीर होणार?)

भुजबळ नाराज?

गेल्या काही दिवसात भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होत आहे. त्यांचा पुतण्या समीर यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून तिकीट देण्यास भाजपाच्या केंद्रीय स्तरावर विरोध झाला. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार आणि ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी भुजबळ यांची भेट घेऊन साधारण दीड तास चर्चा केल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी समाजातर्फे भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला. नाशिकमध्येही भुजबळ यांनी तिकीट नाकारण्यामागे मराठा समाजाचा विरोध, हे एक कारण होते असे बोलले जाते. (Ghatkopar Hoarding Collapse)

ओबीसींवर भिस्त

आता तर थेट महायुतीच्या विरुद्ध उघड भूमिका मांडत ठाकरे यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला. भुजबळ यांची राजकीय वाटचाल वेगळ्या दिशेने जात असल्याचे हे द्योतक आहे. सहा महिन्यात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ओबीसी समाजाचे ध्रुवीकरण करून वेगळ्या मार्गाने लढण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Ghatkopar Hoarding Collapse)

ओबीसी ताकद चाचपणी?

दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ‘ओबीसी बहुजन पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना केली आहेच. शेंडगे स्वतः सांगलीतून निवडणूक लढवली. तसेच सुमारे ३० उमेदवारही विविध मतदार संघात उभे केले असून ओबीसीची ताकद किती आहे, याची चाचपणी तर भुजबळ यांच्याकडून होत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Ghatkopar Hoarding Collapse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.