Ind vs Aus : भारतीय संघाच्या यशामागील पडद्या मागचे चेहरे

90
Ind vs Aus : भारतीय संघाच्या यशामागील पडद्या मागचे चेहरे

ऋजुता लुकतुके

भारताचा विश्वचषकाचा (Ind vs Aus) संघ १४ खेळाडूंचा आहे. आणि या संघाने मैदानावर कौशल्य आणि कामगिरीच्या जोरावर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का, की या चौदा खेळाडूंच्या मागे दिवस रात्र मेहनत घेत असतात ते २० पडद्यामागचे शिलेदार. खेळाडूंना तंदुरुस्त, चपळ, तंत्रशुद्ध ठेवण्याचं आणि मैदानावर रणनीती कशी आखायची यासाठी मदत करण्याचं काम हे शिलेदार अव्याहत करत आहेत.

विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी या शिलेदारांची ओळख करून घेऊया.

राहुल द्रविड, नाम तो सूना होगा?

राहुल द्रविड (Ind vs Aus) खेळत असताना त्याचं नियोजन जितकं काटेकोर होतं, तितकंच निवृत्तीनंतरचं त्याचं नियोजनही काटेकोरच होतं. सुरुवातीला त्याला आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यायचा होता. म्हणून त्याने बंगळुरूमध्ये आपल्या गावी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी मागून घेतली. पण, तिथल्या कामाचं नियोजन अगदी चोख केलं. आज भारतीय क्रिकेटमधील व्यावसायिक क्रिकेटपटूला कुठलीही मदत लागली तर ती इथं मिळते. या मागील डोकं राहुल द्रविडचंच.

विश्वचषक (Ind vs Aus) स्पर्धेसाठीच्या संघ उभारणीला सुरुवात झाली तेव्हा इतके दिवस बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसलेला राहुल द्रविड अचानक (खरंतर ठरवून) मैदानात उतरला. भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षक पद त्याने स्वीकारलं. तेव्हाच या विश्वचषकाची तयारी सुरू झाली होती. एकदिवसीय विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद यांची शास्त्रशुद्ध तयारीच राहुल द्रविडने सुरू केली.

(हेही वाचा – World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर अश्विनला संधी मिळणार?)

मधल्या तीन वर्षांच्या (Ind vs Aus) काळात भारताने जवळ जवळ ६० खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी दिली. आणि त्यातून प्रत्येक क्रमांकावर योग्य खेळाडू हेरले. हे कसब राहुल द्रविडचंच. आणि एकदा खेळाडू हेरल्यावर त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवण्याचं काम रोहीत शर्माने केलं. श्रेयस अय्यरवर विश्वचषकादरम्यानही टीका झाली. पण, राहुल आणि रोहीत आपल्या निर्णयापासून ढळले नाहीत. त्यांनी श्रेयसला पाठिंबा दिला तो दिला.

दुसरी गोष्ट राहुल यांनी केली ती म्हणजे कामगिरीला नाही तर कौशल्याला प्राधान्य दिलं. म्हणजे संघासाठी आवश्यक प्रत्येक भूमिकेसाठी कशाप्रकारचे खेळाडू हवेत, हे आधी पाहिलं आणि मग त्यासाठी कामगिरीच्या नाही तर कौशल्याच्या जोरावर खेळाडू निवडले. म्हणून तर टी-२० स्पर्धा गाजवलेला सुर्यकुमार हार्दिकला दुखापत होईपर्यंत संघाबाहेर होता. (Ind vs Aus)

राहुल द्रविडच्या या अथक मेहनतीने घडला आहे आताचा हा विश्वचषक संघ. आणि त्यासाठी राहुलने आपल्या सहकाऱ्यांची निवडही तशीच चोख केली आहे.

(हेही वाचा – World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर)

राहुल द्रविड यांची प्रशिक्षकांची फळी

राहुल द्रविड (Ind vs Aus) बरोबर आहेत फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप. हे तिघे १९ वर्षांखालील किंवा भारताच्या अ संघाबरोबर काम करत होते. त्यामुळे आताच्या संघातील बहुतेक खेळाडू या तिघांना सुरुवातीपासून माहीत होते. त्यामुळे खेळाडूंबरोबरचा त्यांचा संवाद चांगला होता.

खेळाडूंच्या गरजा ओळखून त्या प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम (Ind vs Aus) तयार करणं, खेळातील त्रुटी ओळखून त्यावर काम करायला खेळाडूंना मदत करणं, त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवणं ही कामं या शिलेदारांनी चोख पार पाडली. किंबहुना, या कामांची त्यांना सवयच होती.

टी दिलिप यांनी स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी पुरस्कार ठेवला. तो प्रयोग खूपच यशस्वी ठरला. आताचे मैदानावर चेंडू अडवण्यासाठी झोकून देणारे खेळाडू दिसतायत ते काही उगाच नाही. शिवाय इथंही दिलिप यांनी झेल पकडण्या इतकंच महत्त्व धावा अडवण्यालाही दिलं. (Ind vs Aus)

पारस म्हांब्रे यांनी दुखापतीनंतर संघात परतलेल्या बुमराला पूर्ण सहकार्य केलं. अगदी सामना चालू असतानाही ते कामगिरीचं विश्लेषण करत असतात. आणि खेळाडूंना वेळोवेळी चेंडूची दिशा आणि टप्पा यावर मार्गदर्शन करत असतात. (Ind vs Aus)

(हेही वाचा – Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी)

प्रशिक्षकांचे सहकारी

या तीन प्रशिक्षकांव्यतिरिक्त खेळाडू जेव्हा प्रत्यक्ष नेट्समध्ये घाम गाळत असतात तेव्हा त्यांच्याबरोबर असतात रघुवेंद्र दिगी उर्फ रघू, नुवान उदेनाका आणि दयानंद गरानी. यातील रघू हा फलंदाजांमध्ये विशेष लोकप्रिय. तो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आहे. म्हणजे नेट्समध्ये खेळाडूंना वेगवान चेंडू टाकतो. (Ind vs Aus)

२०११ पासून तो भारतीय संघाबरोबर आहे. आणि आज ३८ वर्षांचा असला तरी त्याचा नेट्समधील वेग कमी झालेला नाही. परदेशातील खेळपट्ट्यावर तिथल्या तेज गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज आत्मविश्वासाने उभे राहू लागले याचं श्रेय अगदी सचिन तेंडुलकर पासून विराट कोहलीपर्यंत सगळे रघूला देतात. कोहली तर रघूला भारताचं सिक्रेट वेपन मानतो. (Ind vs Aus)

रघू बरोबरच नुवान आणि दयानंद यांनी फलंदाजांना आवश्यक अशी गोलंदाजीतील विविधता नेट्समध्ये आणली आहे.

इतर महत्त्वाचा सपोर्ट स्टाफ

फक्त खेळणं आणि सराव महत्त्वाचा नाहीए. संघाबरोबर नियमितपणे आहेत काही फीजिओ, अंगमेहनत घेणारे स्ट्रेंग्थ ट्रेनर, मसाजर, ॲनालिस्ट आणि संघाचं वेळापत्रक जमवणारा लॉजिस्टिक्स मॅनेजर त्यांची नावंही पाहूया (Ind vs Aus)

(हेही वाचा – World Cup 2023 : भारतीय संघाचा विक्रमांचा ‘विक्रम’)

भारताचा सपोर्ट स्टाफ :

मुख्य प्रशिक्षक – राहुल द्रविड, फलंदाजीचे प्रशिक्षक – विक्रम राठोड, गोलंदाजीचे प्रशिक्षक – पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक – टी दिलिप, फीजिओ – कमलेश जैन व योगेश परमार, ट्रेनिंग सहकारी – रघुवेंद्र दिगी, नुवान उदेनाका व दयानंद गिरानी, मसाज – अरुण कानडे, राजीव कुमार, स्ट्रेंग्थ अँड कन्डिशनिंग प्रशिक्षक – सोहम देसाई, रजनीकांत, ॲनालिस्ट – हरिप्रसाद मोहन, व्यवस्थापक – ऋषिकेश उपाध्याय, सुरक्षा अधिकारी – विपुल यादव, दिनेश चहल, संघाचे डॉक्टर – डॉ. रिझवान, मीडिया मॅनेजर – आनंद सुब्रमण्यम् , लाएजन अधिकारी – अमित सिद्धेश्वर (Ind vs Aus)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.