Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी

96
Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी

रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Final) यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे.

रविवारी होणाऱ्या अंतिम फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (Ind vs Aus Final) मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स प्रमुख भूमिका बजावू शकतात, तर भारताकडून रोहित शर्मा आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या शुभमन गिल यांच्याशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी प्रमुख भूमिकेत असतील.

वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवार १९ नोव्हेंबरला (Ind vs Aus Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. भारताने या विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. यावरून आता रोहित शर्माची ब्ल्यू आर्मी फायनल मॅचसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – India vs Aus Final : भारत सलग ९ सामन्यांमध्ये विजयी पण, कर्णधार रोहित शर्माला ‘या’ गोष्टींची चिंता )

भारतीय संघाला अनुकूल खेळपट्टी

प्रत्येक सामन्यासाठी अनुकूल अशी खेळपट्टी मिळणं हे त्या संघाचं (Ind vs Aus Final) भाग्यच असतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशातच फायनलसाठी खेळपट्टी कशी असणार यावर वेगवेळ्या चर्चा सुरु असतांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील (Ind vs Aus Final) खेळपट्टी ही भारतीय संघाला अनुकूल असल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी केलेल्या चर्चेवरून ही माहिती मिळाली आहे. प्रत्येक सामन्यासाठी भारतीय संघ त्या – त्या शहरात दाखल झाल्यानंतर प्रशिक्षक द्रविड आपल्या सहकाऱ्यांसह थेट मैदानावर जाऊन खेळपट्टी तपासून घेतात, आणि त्यानुसार सामन्याची रणनीती आखली जाते.

याचाच परिणाम म्हणून भारताने या विश्वचषकातील सर्व सामने आपल्या खिशात घातले आहेत.

(हेही वाचा – World Cup 2023 : भारतीय संघाचा विक्रमांचा ‘विक्रम’)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ind vs Aus Final) तयार केलेली खेळपट्टी काळीशार आहे. त्यामुळे ही खेळपट्टी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासारखी असण्याची शक्यता आहे. त्या सामन्यांत चेंडू खूप खाली राहत होते. महंमद सिराजच्या खाली राहिलेल्या चेंडूवर बाबर आझम बाद झाला होता.

अहमदाबादला यापूर्वी स्पर्धेतील चार सामने (Ind vs Aus Final) झाले आहेत. या लढती झालेल्यांपैकी एका खेळपट्टीवर सामना होणार की पूर्णपणे नवीन खेळपट्टी असणार, याबाबत नेमके समजू शकले नाही. मात्र, खेळपट्टीवरून मोठ्या प्रमाणावर रोलर फिरवण्यात येत होता. ‘काळी माती असलेल्या खेळपट्टीवर रोलर फिरवल्यास तिचा वेग कमी होतो. या खेळपट्टीवर फटकेबाजी करता येते; पण त्याच वेळी चेंडूच्या रेषेत येऊन सातत्याने चेंडू फटकावता येत नाही. या खेळपट्टीवर ३१५ धावांचेही संरक्षण करता येते. त्याचबरोबर धावांचा पाठलाग सोपा नसतो,’ असे गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.