Megablock : मध्य रेल्वेचा ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

50
Megablock : मध्य रेल्वेचा 'या' मार्गावर मेगाब्लॉक
Megablock : मध्य रेल्वेचा 'या' मार्गावर मेगाब्लॉक

 मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील सीएसएमटी – विद्याविहार, हार्बर मार्गावर ब्लॉक आहे. मुख्य, हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. (Megablock)

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – सांताक्रूझदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वे (Central Railway)

● कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

● कधी : रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

● परिणाम : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळी सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला आणि त्यानंतर नियोजित स्थानकात थांबा घेतील. (Megablock)

(हेही वाचा : UPI Alert : 31 डिसेंबरपर्यंत करा ही कामे ,नाहीतर यूपीआय नंबर होणार बंद)

हार्बर मार्ग

● कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

● कधी : रविवारी सकाळी ९.५३ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत

● परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – वाशी / पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – गोरेगाव / वांद्रे लोकल रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

● कुठे : गोरेगाव – सांताक्रूझ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर

● कधी : शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.