Bandra Cylinder Blast: वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; 8 जण होरपळले

74
Bandra Cylinder Blast: वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; 8 जण होरपळले
Bandra Cylinder Blast: वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; 8 जण होरपळले

वांद्रे येथील गजधर डॅम रोडवरील फिटर गल्लीमध्ये शनिवारी(१८ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. (Bandra Cylinder Blast )

या स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती.अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना वांद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं माहिती समोर आली आहे. (Bandra Cylinder Blast)

(हेही वाचा :Megablock : मध्य रेल्वेचा ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक)

निखिल जोगेश दास (५३), राकेश रामजनम शर्मा (३८), अँटोनी पॉल थेंगल (६५), कालीचरण मजीलाल कन्नौजिया (५४) आणि शान अली झाकीर अली सिद्दीकी (३१), समशेर (५०), संगीता (३२) आणि सीता (४५) अशी जखमींची नावे आहेत.

(हेही वाचा :UPI Alert : 31 डिसेंबरपर्यंत करा ही कामे ,नाहीतर यूपीआय नंबर होणार बंद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.