HD Revanna: जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांना एसआयटीने केली अटक, अपहरणाच्या गुन्ह्यात कारवाई

एका महिलेच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

87
HD Revanna: जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांना एसआयटीने केली अटक, अपहरणाच्या गुन्ह्यात कारवाई

जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमधील केआर नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली. एसआयटीचे पथक शनिवारी, (२ मे) त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. (HD Revanna)

बेंगळुरूच्या के. आर. नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अपहरण प्रकरणात एसआयटी अधिकाऱ्यांनी जेडी (एस) नेते एच. डी. रेवण्णा यांना ताब्यात घेतले आहे. अपहरण आणि लैंगिक शोषण याप्रकरणी त्यांना एसआयटीकडून अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – North East Mumbai LS Constituency : ईशान्य मुंबईत पाच उमेदवार संजय पाटील)

एका महिलेच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या महिलेचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. पीडित महिलेच्या मुलाने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची आई एच. डी. रेवण्णाच्या घरी ६ वर्षे घरकाम म्हणून काम करत होती. त्यानंतर ती तिच्या गावी परतली. जिथे ती रोजंदारीवर काम करत होती.

त्यानंतर विद्यमान खासदार आणि हसनचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांनी त्याच्या आईवर केलेल्या लैंगिक शोषणाचे चित्रण करणारा एक व्हिडिओ सापडला. तो मुलगा म्हणाला की, व्हिडिओ उघडकीस आल्यानंतर लगेचच त्याची आई बेपत्ता झाली. त्यानंतर त्याने गुरुवारी रात्री एच. डी. रेवण्णा आणि बाबण्णा यांच्याविरोधात गुरुवारी, (२मे) बेंगळुरू पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली.

होलेनारीपुरा आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 364 ए (खंडणीसाठी अपहरण) 365 (हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने अपहरण) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने या नेत्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. सुमारे दोन तास या प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी एच. डी. रेवण्णा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेसह या संदर्भात दाखल केलेला अर्ज फेटाळला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.