Indian Air Force: जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ५ जवान जखमी

शनिवारी, (२ मे) सायंकाळी हवाई दलाच्या जवानांचा ताफा निघाला होता.

91
Indian Air Force: जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ५ जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. (Indian Air Force)

शनिवारी, (२ मे) सायंकाळी हवाई दलाच्या जवानांचा ताफा निघाला होता. २ वाहनांमधून हे जवान जात होते. पुंछ जिल्ह्यातील सूरनकोटमधील सनाई गावाजवळ या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले आहेत. शाहसीताजवळील हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षा दलाचे अधिकारी यासंदर्भात अधिक माहिती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

(हेही वाचा – North East Mumbai LS Constituency : ईशान्य मुंबईत पाच उमेदवार संजय पाटील

)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.