World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर

१० पैकी १० साखळी सामने जिंकून भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. आता २०११ प्रमाणेच घरच्या मैदानात विश्वविजेती कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.

76
World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर
World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर
  • ऋजुता लुकतुके

१० पैकी १० साखळी सामने जिंकून भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. आता २०११ प्रमाणेच घरच्या मैदानात विश्वविजेती कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. (World Cup Final Ind vs Aus)

विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांबरोबरच अहमदाबादचं क्रिकेट मैदान, मैदानावर येणारे सव्वा लाख प्रेक्षक आणि मैदानावर नाही पण, घरी बसून या सामन्याचा आनंद लुटणारे १.३ अब्ज भारतीय नागरिक असे सगळे या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलिया विश्वचषकात विक्रमी सहावं विजेतेपद पटकावणार की, भारतीय संघ घरच्या प्रेक्षकांसमोर १३ वर्षांनंतर विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणार याचा फैसला आता रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होईल. (World Cup Final Ind vs Aus)

पण, भारताला अंतिम सामना जिंकायला असेल तर त्यांचं लक्ष ‘या’ पाच मुद्‌दयांवर असेल. (World Cup Final Ind vs Aus)

१. रोहित शर्मा नेहमीसारखी घणाघाती सुरुवात करून देईल का?

मधल्या फळीतील विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी वेळोवेळी संघाला गरज असताना शतकं ठोकून धावसंख्येला आकार दिलाय. पण, या सगळ्यांना नियमितपणे चांगली सुरूवात करून देण्याचं काम सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा करतोय. पॉवरप्ले दरम्यान फक्त दोन क्षेत्ररक्षक ३० यार्डांच्या बाहेर असतात तेव्हा संघाची धावगती षटकामागे सात धावांच्या वर ठेवण्याचं काम रोहितने सातत्याने केलं आहे. (World Cup Final Ind vs Aus)

म्हणूनच उपांत्य सामन्यात विजयाचा हीरो कोण असा प्रश्न विचारल्यावर नियमितपणे फलंदाजीचा पाया रचणारा रोहित शर्मा, असं उत्तर इंग्लिश माजी खेळाडू नासिर हुसेननं दिलं होतं. (World Cup Final Ind vs Aus)

रोहितने स्वत: आतापर्यंत १० सामन्यात ५५० धावा केल्या आहेत. १ शतक आणि ३ अर्धशतकं केली आहेत. आता अंतिम सामन्यात भारताला त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. (World Cup Final Ind vs Aus)

२. विराटकडून आणखी एक खास अंतिम फेरीतील खेळी

विराट कोहली या विश्वचषकात असा खेळतोय की वाटावं हा कधीच बाद होणार नाही. एका इराद्यानेच तो मैदानावर उतरतो आणि एक बाजू लावून धरण्याचं काम जीवावर उदार होऊन करतो. या स्पर्धेतील त्याच्या १० डावांमधील धावा आहेत – ८५, ५५, १६, १०३, ९५, ०, ८८, १०१, ५१, ११७ (World Cup Final Ind vs Aus)

मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तो ८८ धावांवर बाद झाला. सचिनच्या विक्रमी ४९ व्या शतकाची बरोबरी करण्याची त्याची संधी १२ धावांनी हुकली. सामन्याचं समालोचन करणाऱ्या नासीर हुसेननं त्याचं सांत्वन करताना म्हटलं, ‘तू लवकरच ४९ वं शतक पूर्ण करशील. काही दिवसांचा प्रश्न आहे.’ (World Cup Final Ind vs Aus)

पुढे हाच नासीर विराटच्या ४९ व्या आणि ५०व्या शतकाचाही साक्षीदार झाला. पुढच्या तीन सामन्यांतच. अखेर तो म्हणाला, ‘त्याला धीर देताना काही दिवसांतच हे शतक पूर्ण करशील असं मी म्हणालो होतो. पण, मला कल्पनाही नव्हती हे लवकर इतक्या लवकर असेल!’ (World Cup Final Ind vs Aus)

विराटचा धडाकाच असा आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक बाजू लावून धरायची आणि धावांचा वेग राखत जमेल तितका वेळ फलंदाजी करायची ही भूमिका विराट अगदी तंतोतंत बजावतोय. त्याची अशीच एक खास एकदिवसीय खेळी अहमदाबादवर बघायला मिळाली, तर भारताला विजय अवघड जाणार नाही. आतापर्यंत विराटने या स्पर्धेत १० सामन्यांत ७११ धावा केल्या आहेत त्या १०१ धावांच्या अविश्वसनीय सरासरीने. (World Cup Final Ind vs Aus)

३. कुलदीप वि. मॅक्सवेल द्वंद्वात कोण जिंकेल?

आता ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात दिसतोय याचं बरंचसं श्रेय ग्लेन मॅक्सवेल या त्यांच्या सहाव्या क्रमांकावरील फलंदाजाच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या खेळीला जातं. ७ गडी ९१ धावांत बाद झाले असताना तो २०१ धावांची खेळी खेळला नसता, तर ऑस्ट्रेलियाला तो मोक्याचा सामना जिंकता आला नसता. आणि कदाचित संघ उपान्त्य फेरीतच पोहोचला नसता. (World Cup Final Ind vs Aus)

पण, आता संघ अंतिम फेरीत आहे. आणि मधल्या फळीत मॅक्सवेलला रोखण्याची जबाबदारी कुलदीप यादववर असणार आहे. कुलदीप फारशा धावा न देता मोक्याचे बळी टिपण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता ही जबाबदारी त्याला पुन्हा एकदा पेलायची आहे. साखळी सामन्यातही कुलदीपनेच मॅक्सवेलला १५ धावांवर त्रिफळाचीत केलं होतं. (World Cup Final Ind vs Aus)

तर या संपूर्ण स्पर्धेत मॅक्सवेल फिरकी गोलंदाजांना खेळण्यात कमी पडला आहे. त्यामुळे इथंही कुलदीपकडून भारतीय संघाला अपेक्षा असेल. (World Cup Final Ind vs Aus)

४. मार्श, वॉर्नर आणि हेडला झटपट गुंडाळता येईल?

ऑस्ट्रेलियन फलंदाजांची ताकद मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड यांच्या घणाघाती फलंदाजीत आहे. यांच्यातील एकजरी टिकला आणि त्याने घणाघात सुरूच ठेवला तर सामन्याचा नूर पालटवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. (World Cup Final Ind vs Aus)

वॉर्नर तर या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने १० सामन्यांत ५२८ धावा केल्या आहेत. आता या तिघांना झटपट गुंडाळण्याचं काम भारताचा अचूक मारा करणारा गोलंदाज जसप्रीत बुमरा, बळी मिळवण्याची क्षमता असलेला महम्मद सिराज आणि भन्नाट फॉर्ममध्ये असलेला महम्मद शामी यांना करावं लागणार आहे. (World Cup Final Ind vs Aus)

(हेही वाचा – World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर अश्विनला संधी मिळणार?)

५. मोहम्मद शामी भारताचं मुख्य अस्त्र?

या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात मोहम्मद शामी खेळलाही नव्हता. कारण, अंतिम अकरा खेळाडूंच्या गणितात तो बसतच नव्हता. पण, हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली आणि त्याने सोनं केलं. पुढच्या ८ सामन्यांतच त्याने विश्वचषकातील इतर सगळ्या गोलंदाजांना मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे. (World Cup Final Ind vs Aus)

आता त्याच्या नावावर २४ बळी आहेत आणि आपल्या पहिल्याच षटकात बळी मिळवण्याची हातोटी त्याला साधलीय. जेव्हा जेव्हा रोहितने त्याच्याकडे मदत मागितली, शामीने कायम त्याला बळी मिळवून दिलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात तर त्याने ५७ धावा देत ७ बळी टिपले. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याची कामगिरी कशी होते यावर बरंच काही अवलंबून आहे. कारण, अहमदाबादची खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात तीन फिरकी गोलंदाज खेळवण्यावरही विचार होतोय. तसं झालं तर शामीला बुमराच्या बरोबर तेज गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. (World Cup Final Ind vs Aus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.