Indian Railway Campaign :रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

62
Indian Railway Campaign :रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई
Indian Railway Campaign :रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

भारतीय रेल्वेने धावत्या रेल्वे गाड्यांना आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली होती. १४ दिवसांच्या मोहिमेंतर्गत ३७ हजार ३११ ट्रेन आणि २२ हजार ११० स्थानकांची तपासणी केली आहे. ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई केली आहे. (Indian Railway Campaign)

धावत्या रेल्वे गाड्यांत आणि रेल्वे स्थानकांत आगीच्या घटना कमी करण्यासाठी रेल्वेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीत उत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी फटाके घेऊन प्रवास करत असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली. (Indian Railway Campaign)

(हेही वाचा : Bandra Cylinder Blast: वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; 8 जण होरपळले)

फटाके वाहून नेल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका असल्याने भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत पार्सल व्हॅन, प्रवाशांच्या सामानाची तपासणी आणि ज्वलनशील वस्तूंसाठी गाड्यांमधील डस्टबिन तपासणे यांचा समावेश आहे. यात मध्य रेल्वेने ४१६ ट्रेनची ५४ स्थानके आणि ३७ यार्ड, वॉशिंग लाइन, पिट लाइनची तपासणी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनिश कुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली..

(हेही वाचा : Megablock : मध्य रेल्वेचा ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.