Rajasthan Assembly Elections : राजस्थानातील राजा-महाराजांची निष्ठा वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरातील तमाम राजेशाहीला आळा घातला गेला आणि त्यांच्या हातातील सत्ता लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हाती आली.

72
Rajasthan Assembly Elections : राजस्थानातील राजा-महाराजांची निष्ठा वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून
Rajasthan Assembly Elections : राजस्थानातील राजा-महाराजांची निष्ठा वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून
  • वंदना बर्वे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरातील तमाम राजेशाहीला आळा घातला गेला आणि त्यांच्या हातातील सत्ता लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हाती आली. तरीसुध्दा, देशभरात कितीतरी कुटुंब असे आहेत जे राजघराण्याशी संबधित आहेत आणि आता देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. यात राजस्थान आघाडीवर असलेलं राज्य आहे हे येथे उल्लेखनीय. राजस्थानमध्ये २०० सदस्यांच्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणे आहे. मात्र, राजस्थानमधील राजघरण्याची चर्चा केली नाही तर राजस्थानवर अन्याय केल्यासारखे होईल. (Rajasthan Assembly Elections)

राजस्थानच्या राजकारणात आजही राजघराण्यातील व्यक्तींचा बोलबाला आहे. त्यांच्या शब्दाला मान आहे आणि कितीतरी राजकीय पक्षांमध्ये ते बोट ठेवतील त्यांना उमेदवारी दिली जाते अशी परिस्थिती आहे. केवळ तिकीट वितरणच नव्हे तर राजस्थानची जनता सुध्दा राजघराण्यातील माणसं ज्याचे नाव सांगतील त्याला मतदान करतात. मात्र, राजस्थानच्या राजकारणाचे एक कटू सत्य आहे. ते म्हणजे राजघराण्यातील मंडळींची आस्था हवेच्या दिशेप्रमाणे बदलत आली आहे. राजघराण्यातील मंडळी आतापर्यंत कितीतरी वेळा भाजपातून कॉंग्रेसमध्ये आणि कॉंग्रेसमधून भाजपात गेले आहेत. तर कधी स्वतंत्र पक्ष काढून राजकारणात सक्रीय राहिलेत. (Rajasthan Assembly Elections)

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे धौलपूरच्या महाराणी होय. खासदार दीयाकुमारी विधानसभेच्या मैदानात आहेत. महाराना प्रताप यांचे वंशज उदयपूर येथील एकेकाळच्या राजघराणाचे शिवराजसिंग नाथद्वारा येथून निवडणूक लढत आहेत. भरतपूरचे महाराजा विश्वेंद्र सिंग डीग-कुम्हेरमधून, सिध्दी कुमार बिकानेर पूर्वमधून, कोटाचे राजपरिवाराचे सदस्य कल्पना देवी, रणधीर सिंग, सुरेंद्र सिंग आणि खिंवसर राजघराण्याचे गजेंद्र सिंग निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. (Rajasthan Assembly Elections)

जयपूरच्या माजी राजमाता गायत्री देवी यांनी राजस्थानमध्ये स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता आणि जयपूरच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांचे चिरंजीव भवानी सिंग कॉंग्रेसमध्ये सामील झाले. जयपूरमधून लोकसभेची निवडणूक लढलेत आणि पराभूत झालेत. आता भवानीसिंग यांची कन्या दीयाकुमार राजसमंदच्या खासदार आहेत आणि विधानसभेची निवडणूक लढत आहेत. अलवर राजघराण्याच्या एकेकाळच्या महारानी महेंद्र कुमारी भाजपच्या तिकीटवर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांचे चिरंजीव जितेंद्र सिंग कॉंग्रेसमध्ये आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे खास आहेत आणि राष्ट्रीय महासचिव पदावर आहेत. (Rajasthan Assembly Elections)

(हेही वाचा – Indian Railway Campaign : रेल्वे ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई)

भरतपूर राजघराण्याचे विश्वेंद्र सिंग आधी भाजपात होते. यानंतर कॉंग्रेसच्या तिकीटवर ते आमदार म्हणून निवडून आले आणि आता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. विश्वेंद्र सिंग यांच्या पत्नी दिव्या सिंग भाजपच्या खासदार होत्या. विश्वेंद्र सिंग यांचे काका मानसिंग अपक्ष आमदार होते आणि काकाची मुलगी कृष्णेंद्र कौर भाजपच्या आमदार होत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मंत्रिमंडळात मंत्री होत्या. (Rajasthan Assembly Elections)

कोटाच्या राजघराण्याचे सदस्य इज्येराज सिंग कॉंग्रेसचे खासदार होते आणि आता त्यांची पत्नी कल्पना देवी भाजपच्या तिकीटवर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. जोधपूर राजघराण्याच्या चंद्रेश कुमारी कॉंग्रेसच्या खासदार होत्या. डु्ंगरपूर राजघराण्याचे हर्षवर्धन भाजपच्या तिकीटवर राज्यसभेत निवडून गेले होते. यापूर्वी, डुंगरपूर, बांसवाडा आणि सीकर येथील राजघराण्यांच्या सदस्यांनी सुध्दा हवेची दिशा बघून राजकीय पक्षांवर आपली आस्था दाखविली आहे. (Rajasthan Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.