Byculla Crime : भायखळ्यात गोळीबार, एक जखमी

गोळीबारात एक जण जण जखमी असून जखमीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

56
Byculla Crime : भायखळ्यात गोळीबार, एक जखमी
Byculla Crime : भायखळ्यात गोळीबार, एक जखमी

भायखळ्यातील माझगाव येथे मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या गोळीबारात एक जण जण जखमी असून जखमीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी भायखळा पोलिसांनी दोन अनोळखी हल्लेखोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Byculla Crime)

भायखळा माझगाव येथील डॉ. शिवदास चापसी रोड वरील मुंबई वेलकम ड्रेसेस या दुकानासमोर शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जखमी इसम आपल्या तीन मित्रांसह गप्पा मारत उभे असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने कमरेला लावलेले पिस्तुल काढत चौघांच्या दिशेने रोखून गोळ्या झाडुन पळ काढला. या गोळीबारात एकाच्या पायाला गोळी लागली. जखमींना इतर मित्रांनी उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Byculla Crime)

(हेही वाचा – Ind vs Aus : भारतीय संघाच्या यशामागील पडद्या मागचे चेहरे)

या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Byculla Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.