-
ऋजुता लुकतुके
Ind vs Afg, ODI Match भारताचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सामन्यानंतर सुरू असलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि स्क्रीनवर आईचा फोन दिसताच त्याने पत्रकार परिषद काही क्षणांसाठी थांबवली. “सॉरी, मला हा कॉल घ्यावाच लागेल,” असे म्हणत त्याने आईशी संवाद साधला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Ind vs Afg, ODI Match)
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नितीशने प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने मोक्याच्या क्षणी दोन बळी मिळवले. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याच्याकडे कामगिरीबाबत प्रश्न विचारले जात असताना हा अनपेक्षित प्रसंग घडला. (Ind vs Afg, ODI Match)
फोन वाजल्यानंतर नितीशने उपस्थित पत्रकारांची माफी मागितली आणि आईचा कॉल घेतला. काही क्षण तो आईशी बोलत राहिला. कॉल संपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि उपस्थितांमध्येही हलकेफुलके वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्याने पुन्हा पत्रकार परिषद सुरू केली. (Ind vs Afg, ODI Match)
(हेही वाचा – US – Iran War Ends : होर्मुझ खाडीवरील नाकेबंदी हटवताना ट्रम्प नेमकं काय म्हणाले?)
Nitish Kumar Reddy’s mother calls him when he was attending Press Conference. 😄❤️ pic.twitter.com/fwyoE8z7va
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2026
या प्रसंगाने नितीशचा कुटुंबाशी असलेला जिव्हाळा आणि साधेपणा अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळत असतानाही कुटुंबाला दिलेले महत्त्व चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “आईचा फोन म्हणजे सर्वात महत्त्वाचा कॉल” अशा प्रतिक्रिया देत नितीशचे कौतुक केले. (Ind vs Afg, ODI Match)
सामन्यानंतर बोलताना नितीशने संघ व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले. हार्दिकच्या अनुपस्थितीत मिळालेली संधी मोठी असल्याचे सांगत त्याने पुढेही सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी सामन्यांमध्ये संघासाठी अधिक योगदान देण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली. (Ind vs Afg, ODI Match)
गेल्या काही महिन्यांत नितीशने भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत योगदान देण्याच्या क्षमतेमुळे तो भविष्यातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिला जात आहे. (Ind vs Afg, ODI Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

