Ind vs Afg, ODI Match : अफगाणिस्तानविरुद्ध धावचित झाल्यावर चिडलेला रोहित शर्मा शुभमनला काय म्हणाला?

गिलनेच सामन्यानंतर हा संवाद उघड केला आहे.

85
Ind vs Afg, ODI Match : अफगाणिस्तानविरुद्ध धावचित झाल्यावर चिडलेला रोहित शर्मा शुभमनला काय म्हणाला?
Ind vs Afg, ODI Match : अफगाणिस्तानविरुद्ध धावचित झाल्यावर चिडलेला रोहित शर्मा शुभमनला काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

Ind vs Afg, ODI Match : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे आजी माजी कर्णधार म्हणजेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) मैदानावर होते. दोघांचा चांगलाच जम बसलेला असतानाच त्यांनी धाव घेण्यात चूक केली. आणि परिणामी, रोहित शर्माला धावचित व्हावं लागलं. १६ धावांतच त्याचा डाव आटोपला. हा गोंधळ चर्चेचा विषय ठरला होता. सामन्यानंतर गिलने या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना रोहितने रिप्ले पाहिल्यानंतर काय सांगितले, याबाबत खुलासा केला.

सामन्याच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला होता. धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित आणि गिल यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. गिलने चेंडू खेळल्यानंतर धाव घेण्यासाठी हाक दिली, मात्र काही क्षणांतच तो माघारीही फिरला. आणि दुसऱ्या बाजूला रोहित मात्र बाद झाला. अनुभवी फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत या घटनेबाबत विचारले असता गिलने सांगितले की, डाव संपल्यानंतर रोहितने रिप्ले पाहिला आणि परिस्थिती समजून घेतली. “त्याने रिप्ले पाहिला. त्यानंतर तो म्हणाला, ‘ठीक आहे, काही हरकत नाही.’ अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात,” असे गिलने सांगितले.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माला आगामी दिवसांत वैभव सुर्यवंशीचे आव्हान?)

गिलने पुढे स्पष्ट केले की, मैदानावरील निर्णय काही सेकंदांत घ्यावे लागतात आणि कधीकधी अशा चुका होतात. मात्र संघातील वातावरण सकारात्मक असल्याने या घटनेचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. उलट रोहितने परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळल्याचे गिलने नमूद केले. मैदानावर रोहित काहीसा नाराज झालेला दिसला. पण, नंतर तो शांतही झाल्याचं गिलच्या बोलण्यावरुन दिसतंय.

रोहित बाद झाल्यावर मात्र गिलने जबाबदारी स्वीकारत डाव सावरला. आणि शेवटपर्यंत नाबाद राहत ८२ धावा केल्या. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि अखेरीस विजयाच्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे सुरुवातीच्या धक्क्यानंतरही संघाने पुनरागमन करण्यात यश मिळवले.

रोहित आणि गिल हा सलामीचा नवीन प्रयोग या सामन्यात भारताने केला. आणि तो यशस्वी झाल्यामुळे आघाडीला भारतीय संघाला चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.