-
ऋजुता लुकतुके
US – Iran War Ends अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील अमेरिकन नौदल नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली असून जगभरातील तेलवाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा सागरी मार्ग पुन्हा खुला होणार असल्याचे सांगितले आहे. “Ships of the World, start your engines. Let the oil flow!” (जगभरातील जहाजांनो! जहाजाचं इंजिन सुरू करा. तेलाची वाहतूक सुरू होऊदे.) असा संदेश देत ट्रम्प यांनी जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा दिला. (US – Iran War Ends)
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये प्राथमिक शांतता कराराचा आराखडा तयार झाल्याचे समोर आले आहे. या करारानुसार अमेरिकेकडून इराणी बंदरांवरील नाकेबंदी हटवली जाईल, तर होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त वाहतुकीला परवानगी दिली जाईल. करारावर स्वित्झर्लंडमध्ये औपचारिक स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. (US – Iran War Ends)
(हेही वाचा – Noida International Airport वर पहिले व्यावसायिक विमान यशस्वीरित्या उतरले, १७० शेतकरी लखनौला पोहोचणार; केवळ…)
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक कच्च्या तेलाच्या मोठ्या प्रमाणातील निर्यातीसाठी हा मार्ग वापरला जातो. गेल्या काही महिन्यांतील संघर्षामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्याचा परिणाम जागतिक तेलाच्या किमतींवर झाला होता. (US – Iran War Ends)
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजाराने तात्काळ सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) या दोन्ही प्रमुख तेल निर्देशांकांच्या किमतींमध्ये चार ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गुंतवणूकदारांना तेलपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा असल्याने जागतिक शेअर बाजारांमध्येही तेजीचे वातावरण दिसून आले. (US – Iran War Ends)
(हेही वाचा – US – Iran War Ends : ‘इराणबरोबरच्या तहानंतर मध्य-पूर्व आशियाचा चेहरामोहरा ५० वर्षांत बदलेल,’ – जेडी व्हान्स)
मात्र कराराची अंतिम अंमलबजावणी आणि दीर्घकालीन स्थैर्याबाबत अजूनही काही प्रश्न कायम आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी चर्चा, निर्बंधांमध्ये संभाव्य सवलत आणि सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनाबाबत पुढील ६० दिवसांत अधिक वाटाघाटी होणार आहेत. त्यामुळे तणाव पूर्णपणे संपलेला नसला तरी युद्धविराम आणि तेलवाहतुकीचे पुनरुज्जीवन हा मोठा सकारात्मक टप्पा मानला जात आहे. (US – Iran War Ends)
भारतासह तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्यास कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होऊन इंधनाच्या किमतींवरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. (US – Iran War Ends)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

