Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 

Highest Score in IPL : खेळ फक्त २० षटकांचा असला तरी घणाघाती फलंदाजीमुळे २०० पेक्षा मोठी धावसंख्या संघांना कठीण जात नाही 

113
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअर लीग हा खरंतर एका डावात २० षटकांचा फॉरमॅट (Highest Score in IPL) आहे. पण, खेळाचं वैशिष्ट्यच घणाघाती फलंदाजी हे असल्यामुळे इथं फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. त्या प्रयत्नांत अनेकदा धावांचाही डोंगर उभा राहतो. क्रिकेट जगतातील काही रोमहर्षक आणि मोठ्या धावांचा पाठलाग करणारे सामनेही या स्पर्धेत पाहायला मिळाले आहेत. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)

एकतर दहा फ्रँचाईजींचे दहा संघ असलेल्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या या स्पर्धेत मग एका डावांत अगदी अडीचशे धावाही सहज होतात. त्यातच बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडिअम (Chinnaswamy Stadium) आणि अगदी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही (Wankhede Stadium) त्याच्या तुलनेनं लहान आकारामुळे फलंदाजीचं नंदनवन म्हणून ओळखली जातात. तिथं षटकार अगदी मनाप्रमाणे खेचता येतात. (Highest Score in IPL)

असे उत्तुंग षटकार खेचून अडीचशे पर्यंत धावसंख्या नेलेल्या डावांचा आढावा इथं घेणार आहोत. याच हंगामात आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या अगदी पार २७० धावांच्या पलीकडे गेली आहे. २७० च्या ही पार दोन संघांनी मजल मारली आहे. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- Kaizen Institute: मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांना कायझेनचे प्रशिक्षण)

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 

आयपीएलमधली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या याच हंगामात (२०२४) पाहायला मिळाली आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना ३ बाद २७७ धावांचा डोंगर उभा केला. ट्रेव्हिस हेड (६३) आणि अभिषेक शर्मा (६४) यांनी संघाला तडाखेबंद सुरुवात करून दिली. आणि नंतर हेनरिक क्लासेनने कारकीर्दीतील एक सुरेख खेळी साकारताना ३४ चेंडूंत ८० धावा केल्या. मुंबईकडे हार्दिक, जसप्रीत बुमरा, पियुष चावला अशा अनुभवी गोलंदाजांचा ताफा असताना १८ षटकार सनरायझर्सनी धावसंख्या २७७ वर नेली. याला उत्तर देताना मुंबईनेही निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा केल्या. सामन्यात एकूण ५२३ धावा निघाल्या. आणि ३८ षटकार ठोकले गेले.  (Highest Score in IPL)

(हेही वाचा- IPL 2024 Suryakumar Yadav : अखेर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल)

याच हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनीही दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध खेळताना ७ बाद २७२ धावा केल्या. ३९ चेंडूंत ८५ धावा करणारा सुनील नरेन या धावसंख्येचा शिल्पकार ठरला. अंगक्रिश रघुवंशीनेही ५४ धावा केल्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव झाला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. (Highest Score in IPL)

सर्वोच्च धावसंख्येचा आयपीएल विक्रम मागची दहा वर्षं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या (Royal Challengers) नावावर होता. २०१३ च्या हंगामात पुणे वॉरिअर्स विरुद्ध ५ गडी बाद २६३ धावा केल्या होत्या. यात ख्रिस गेलचा एकट्याचा वाटा होता १७५ धावांचा. त्या त्याने ६६ चेंडूंमध्ये केल्या. त्यानंतर बंगळुरू संघाने पुण्याला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ वर रोखलं. आणि हा सामना १३० धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- IPL 2024 : आयपीएलच्या पहिल्या १० सामन्यांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी)

गेल्याच हंगामात लखनौ सुपरजायंट्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध पाच बाद २५७ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे पंजाबकडून या सामन्यात एकाही फलंदाजाने शतक ठोकलं नाही. पण, काईल मायर्स आणि मार्कस स्टॉयनिस यांचं अर्धशतक आणि निकोलस पुरन, आयुष बदोनी यांनी ४० धावा करून संघाला अडीचशे पार नेलं. हा सामना त्यांनी ५६ धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- IPL 2024 GT vs PBKS : युवराज सिंगचा १२ वर्षांचा विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा कोण आहे?)

चेन्नई सुपरकिंग्ज – २८

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २४

मुंबई इंडियन्स – २३

पंजाब किंग्ज – २२

कोलकाता नाईट रायडर्स – २०

राजस्थान रॉयल्स – १८

सनरायजर्स हैद्राबाद – १७

दिल्ली कॅपिटल्स – ११

गुजरात टायटन्स – ५

लखनौ सुपरजायंट्स – ५

डेक्कन चार्जर्स – १

गुजरात लायन्स – १

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.