Aap: आपचा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर; आता वक्फ बोर्ड घोटाळा

136
Aap: आपचा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर; आता वक्फ बोर्ड घोटाळा
Aap: आपचा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर; आता वक्फ बोर्ड घोटाळा

आम आदमी पार्टीच्या (Aap) अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात आम आदमी पार्टीचे (Aap) राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आधीच तिहार तुरुंगात बंद आहेत. आता अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांच्यावर आपली पकड घट्ट केली आहे. अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) समन्सचे पालन करत नसल्याची तक्रार ईडीने शुक्रवारी (५ मार्च २०२४) राऊस एव्हेन्यू कोर्टात केली होती. (Aap)

(हेही वाचा – IPL 2024 Suryakumar Yadav : अखेर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल)

न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

दरम्यान, दिल्ली वक्फ बोर्डातील (Waqf Board scam) भरतीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात, दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात मार्चमध्ये (Aap) आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ईडीने वारंवार समन्स जारी करूनही अमानतुल्ला खान तपासात सहभागी झाले नाहीत. त्यांची ही वृत्ती तपासात अडथळा आणणारी दिसते. ते लोकप्रतिनिधी असल्याने जबाबदारीचे कारण सांगून तपासात सहभागी होण्याचे टाळू शकत नाही. कायदे सर्वांसाठी समान आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते. कोणताही आमदार किंवा लोकप्रतिनिधी कायद्याच्या वर नाही. (Aap)

(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)

अमानतुल्ला खानशी संबंधित संपूर्ण प्रकरण काय आहे?

आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दिल्ली वक्फ बोर्डाच्या (Waqf Board scam) भरतीतील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना 32 जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी आधीच छापे टाकले होते. वक्फ बोर्डात (Waqf Board scam) बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांच्या भरतीतून अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांनी गुन्ह्यातून मोठी कमाई केल्याचा दावाही ईडीने केला आहे. (Aap)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.