CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयसह काही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

135
CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका

नवजात बालकांच्या तस्करी प्रकरणी शुक्रवारपासून दिल्लीत अनेक ठिकाणी सीबीआयची (CBI) छापेमारी सुरू आहे. यावेळी सीबीआयने ७ ते ८ बालकांची सुटका केली असून एका महिलेसह काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. (CBI)

याप्रकरणी सीबीआयने (CBI) केलेल्या प्राथमिक तपासात नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीचा हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. सध्या सीबीआयचे पथक या प्रकरणी मुलांना विकणाऱ्या महिलेची आणि त्यांना विकत घेतलेल्या व्यक्तीचीही चौकशी करत आहे. छापेमारीच्या वेळी केशव पुरम पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी हजर होते. (CBI)

(हेही वाचा – Statue of Liberty : जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के)

सीबीआयने (CBI) दिल्ली-एनसीआरमधील काही लोकांना अटक केली आहे जे ७-८ मुलांची सुटका केल्यानंतर व्यापार करत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयसह काही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली-एनसीआरमधूनही अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही नवजात बालके विविध हॉस्पिटलमधून चोरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. (CBI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.