Statue of Liberty : जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

दरम्यान, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप गेल्या पाच दशकांतील तिसरा सर्वांत मोठा भूकंप होता. तर न्यू जर्सीमध्ये २४० वर्षांनंतर इतक्या क्षमतेचा भूकंप झाला.

270
Statue of Liberty : जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर (Statue of Liberty) गुरुवारी वीज कोसळली. त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान वीज कोसळल्यानंतर ४.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्याने शहर आणि आजूबाजूचा प्रदेश हादरला आहे. (Statue of Liberty)

गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन दुर्मिळ नैसर्गिक घटना घडल्या असून, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉन, न्यू जर्सीजवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन शहरासह इतर ठिकाणी देखील जाणवले. भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त नाही. (Statue of Liberty)

(हेही वाचा – Alagappa Chettiar : भारतीय व्यापारी आणि समाजसेवक सर अलगप्पा चेट्टियार)

गेल्या पाच दशकांतील तिसरा सर्वांत मोठा भूकंप

भूकंपामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (Statue of Liberty) पूर्णपणे हलू लागला. याशिवाय न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियाच्या गगनचुंबी इमारतींमध्येही भयंकर कंपने जाणवली. यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा कोणत्याही इमारतीचे नुकसान झाले नसले तरी याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Statue of Liberty)

दरम्यान, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप गेल्या पाच दशकांतील तिसरा सर्वांत मोठा भूकंप होता. तर न्यू जर्सीमध्ये २४० वर्षांनंतर इतक्या क्षमतेचा भूकंप झाला. (Statue of Liberty)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.