BMC : आयुक्तांच्या दालनाबाहेर आईचे नाव झळकले, पण इतरांना पडलाय विसर

सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.

9866
BMC : आयुक्तांच्या दालनाबाहेर आईचे नाव झळकले, पण इतरांना पडलाय विसर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य सचिवांनी आपल्या नावापुढे आईचे नाव नमुद करत कार्यालयाबाहेर पाट्या लावल्या. त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही आपल्या दालनाबाहेरील पाटीवर आईचे नाव नमुद केले आहे. परंतु मुंबई महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेरील पाट्यांवर अद्याप आईच्या नावाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. आयुक्त भूषण गगराणी आणि अभिषेक बांगर यांनी आपल्या कार्यालयाबाहेरील नावाच्या पाटीवर आईचे नाव लिहिले असून उर्वरीत दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या पाट्या बदलून आईचे नाव लिहून घेण्यासाठी आग्रह धरलेला दिसत नाही. (BMC)

New Project 2024 05 01T203244.452

सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार १ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारकर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसह मंत्री आणि नेत्यांनीही कार्यालयाबाहेरील पाट्यांवर आईचे नाव नमुद केले आहे. (BMC)

New Project 2024 05 01T203405.298

(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबईत २००४ नंतर प्रथमच महायुतीकडून महिला उमेदवार)

मुंबई महापालिकेत आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर भूषण गगराणी यांनी आपल्या कार्यालयाबाहेर नावाची पाटी लावली असून त्यावर भूषण वर्षा अशोक गगराणी असे नाव लिहिले आहे. तर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनीही आपल्या कार्यालयाबाहेर पाटी लावली आहे, त्यावर अभिजित छाया सुधाकर बांगर असे नाव नमुद केले आहे. परंतु अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या दालनाबाहेरील पाट्यांवर आईचे नावच लिहिलेले नाही. एकाबाजुला महापालिका आयुक्त आपल्या नावापुढे आईचे नाव लिहुन त्या नावाची पाटी प्रदर्शित करतात, तिथे अन्य अतिरिक्त आयुक्तांकडून याचे अनुकरण केले जात नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.