IPL 2024 GT vs PBKS : युवराज सिंगचा १२ वर्षांचा विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा कोण आहे?

IPL 2024 GT vs PBKS : आशुतोष शर्माने पंजाबसाठी १७ चेंडूंत ३१ धावा केल्या. 

3069
IPL 2024 GT vs PBKS : युवराज सिंगचा १२ वर्षांचा विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आशुतोषने १७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावांची शानदार खेळी केली. पंजाबला अशा खेळीची सर्वाधिक गरज असताना आशुतोषने आक्रमक फलंदाजी केली. (IPL 2024 GT vs PBKS)

आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) यांचा जन्म १५ सप्टेंबर १९९८ रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सवर २०२० मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला (Ashutosh Sharma) राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे. (IPL 2024 GT vs PBKS)

(हेही वाचा – Apple Lay-off : ॲपल कंपनीने जेव्हा ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं )

मुंबई इंडियन्सला अजूनही खोलता आले नाही खाते 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने (Ashutosh Sharma) ११ चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने ११ चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा १६ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. (IPL 2024 GT vs PBKS)

सध्या सतराव्या हंगामात, तीनही सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स + २.५१८ च्या उत्कृष्ट नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननेही आतापर्यंतचे तीनही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा नेट + १.२४९२ आहे. यानंतर ३ पैकी २ सामने जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्ज तिसऱ्या आणि लखनौ सुपर जायंट्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पंजाब किंग्ज ४ गुणांसह पाचव्या तर गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद २ गुणांसह सातव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठव्या आणि दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. हैदराबादने ३ सामने खेळले आहेत, त्यापैकी १ पराभव झाला आहे. बंगळुरू आणि दिल्ली ४-४ सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना फक्त १-१ सामना जिंकता आला आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि ते टेबलमध्ये तळाच्या म्हणजे १० व्या स्थानावर आहेत. (IPL 2024 GT vs PBKS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.