Happy Birthday Sachin : सचिनला दिल्या सेहवागने उलट्या शुभेच्छा! व्हिडिओ होतोय व्हायरल

२४ एप्रिलला सचिनने जीवनाचे अर्धशतके पूर्ण केले आहे. भारतीय संघाच्या या माजी खेळाडूवर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तसेच ट्विटरवर सुद्धा Happy Birthday Sachin ट्रेंड होत आहे. पन्नासाव्या जन्मदिनाच्या दिवशी सचिन निवडक व्यक्तींसोबत सिंधुदुर्गात आनंद घेतो आहे.

54
सचिन (Sachin Tendulkar)

२४ एप्रिलला सचिनने जीवनाचे अर्धशतके पूर्ण केले आहे. भारतीय संघाच्या या माजी खेळाडूवर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तसेच ट्विटरवर सुद्धा Happy Birthday Sachin ट्रेंड होत आहे. पन्नासाव्या जन्मदिनाच्या दिवशी सचिन निवडक व्यक्तींसोबत सिंधुदुर्गात आनंद घेतो आहे.

( हेही वाचा :Happy Birthday Sachin : सचिनने भावाचा तो सल्ला ऐकला अन् सिडनीवर साकारली ऐतिहासिक खेळी )

भारताला वन-डे क्रिकेटमध्ये फटकेबाजी म्हणजे काय हे दाखवून देणारा सचिन(Sachin) चाहत्यांच्या ह्रदयावर गेली अडीच दशके राज्य करतो आहे. २०१२ ला क्रिकेटच्या देवाने या क्षेत्रातून सेवानिवृत्ती घेतली होती.‌ तरीही सरणाऱ्या वर्षांसोबत त्याची महत्ता आणि लोकप्रियता वाढत गेली आहे. सर्वसामान्य प्रेक्षक असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज असो…प्रत्येकाला सचिनचे आकर्षक आहे.

सचिन(Sachin) साठी विशेष कलाकृती

सचिनच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काहींनी तर खास सचिन(Sachin) साठी विशेष कलाकृती साकारल्या आहेत. सर्वसामान्य माणसांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत सगळेच त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सचिन(Sachin) ला वेगळ्याच शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देण्याच्या जगावेगळ्या पद्धतीमुळे सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

सचिन(Sachin)
सचिन(Sachin)

काय म्हणाला सेहवाग …

“मैदानावर तुम्ही जे सांगितलं, नेहमी त्याच्या उलट मी केले आहे. त्यामुळे आज तुमच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उलटा होऊन शीर्षासन करत तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. प्रार्थना करतो की तुमचे जीवन असेच पुढे चालत राहू दे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! पाजी, एन्जॉय.”

( हेही वाचा : …तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही: राऊतांच्या ४०० कोटींच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे आव्हान )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.