Happy Birthday Sachin : सचिनने भावाचा तो सल्ला ऐकला अन् सिडनीवर साकारली ऐतिहासिक खेळी

सिडनीच्या त्या मैदानावर सचिन(Sachin Tendulkar) याने  २४१ धावांची खेळी केली. ती खेळी इतिहासातली सर्वात शिस्तबद्ध खेळी मानली जाते.

72
सचिन (Sachin Tendulkar)

क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन (Sachin Tendulkar) तेंडुलकरने २४ एप्रिलला आपल्या आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सचिनवर होत आहे. खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० शतके झळकावणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सचिन पहिला क्रिकेटपटू आहे. २५ वर्षे आपल्या देशासाठी सचिन खेळला आहे. पण या कारर्किदीत त्याने अनेक उतार- चढाव आले.

( हेही वाचा : अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार माहितीये का? आकडा ऐकून थक्क व्हाल! )

सिडनीवरची ती शिस्तबद्ध खेळी

२००३-२००४ ला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेला. सचिनकडून तेव्हा धावा होत नव्हत्या. सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीआधी सचिनचे मोठ्या भावाशी म्हणजे अजितशी बोलणे झाले. त्याने सचिनला मार्गदर्शन केले. अजित म्हणाले, फक्त एक कर म्हणजे आऊटसाईड दी ऑफस्टंपच्या चेंडूला मारायला जाऊ नकोस. मग तुला कोणीच आऊट करू शकत नाही. सचिनने ते चॅलेंज म्हणून घेतले. सिडनीच्या त्या मैदानावर सचिन(Sachin Tendulkar) याने  २४१ धावांची खेळी केली. सचिनची ही खेळी इतिहासातली सर्वात शिस्तबद्ध खेळी मानली जाते.

सचिन (Sachin Tendulkar)

विक्रमादित्य सचिन (Sachin Tendulkar)

सचिनने २०० टेस्ट मॅच, ४६३ वनडे, ३१० फर्स्टक्लास क्रिकेट मॅच आणि ५५१ लिस्ट ए क्रिकेट मॅच खेळल्या. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके केली आहेत. तर वन डे क्रिकेटमध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली. तसेच वनडे क्रिकेटमध्ये १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये नाबाद २४८ धावा ही सचिनची  सर्वोत्तम कामगिरी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.