Lok Sabha Election 2024 : सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारे; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

96

लाव रे तो व्हिडिओ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचार सभेत दाखवला. त्या व्हिडिओत उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत असून, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. जे उबाठा मोदींच गुणगान गात होते, ते मी तुम्हाला ऐकवतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. व्हिडिओ दाखवल्यानंतर सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

यंदाची निवडणूक (Lok Sabha Election 2024) देशाच्या विकासाची, प्रगतीची तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती की, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार ४०० पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत, असे सांगत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

(हेही वाचा Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब)

नरेंद्र मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण, बाप एक नंबरी, बेटा १० नंबरी, आम्हाला काहीजण मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे सहन होत नाही. म्हणूनच मला शिवी देण्याचे प्रकार सुरु आहेत. हा माझा नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला सुनावले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.