कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू

उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वॉर्डात ठेवले होते. परंतु, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.

226
चित्ता(Cheetah)

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. उदय असे या चित्त्याचे नाव असून 23 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या चित्त्याचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता(Cheetah) साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा : Happy Birthday Sachin : सचिनने भावाचा तो सल्ला ऐकला अन् सिडनीवर साकारली ऐतिहासिक खेळी)

उदय चित्ता(Cheetah) मान खाली घालून बसला होता…

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी 9 वाजेच्या सुमारास उदय चित्ता(Cheetah) मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याबाबत वन्यप्राणी चिकित्सकांना सूचना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केले. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वॉर्डात ठेवले होते. परंतु, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.

20 चित्त्यांपैकी आता उरले 18 चित्ते

याबाबत महिती देताना प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले की, या चित्त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 8 चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये नामिबियातून चित्ता आणण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर विशेष विमानाने हे आठ चित्ते भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियामधून आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. हे सर्व चित्ते आपल्या नव्या घरी रुळले होते. हे चित्ते शिकारदेखील व्यवस्थितपणे करत होते. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. मात्र, यातील दोन चित्त्यांचा आता मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.