Anurag Thakur : ‘देशातील ॲथलीटना देणार डिजिटल कार्ड,’ – अनुराग ठाकूर

या डिजिटल कार्डावर खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग आणि कामगिरी नोंदवली जाईल. 

91
Anurag Thakur : ‘देशातील ॲथलीटना देणार डिजिटल कार्ड,’ - अनुराग ठाकूर
  • ऋजुता लुकतुके

देशातील नोंदणीकृत ॲथलीटना डिजिटल सर्टिफिकिट देण्याची घोषणा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी गुरुवारी केली आहे. या प्रमाणपत्रावर खेळाडूंची देशांतर्गत कामगिरी आणि स्पर्धेतील सहभाग नोंदवला जाईल. यामुळे खेळाडूंची कामगिरी पारदर्शकपणे नोंदवणं शक्य होईल. (Anurag Thakur)

‘देशात क्रीडा क्षेत्राचा विकास होतोय. आणि आपले ॲथलीटच या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते विजय मिळवत आहेत. अशावेळी खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग आणि कामगिरी यांची नोंद घेणं सोपं जावं यासाठी क्रीडा मंत्रालयाने डिजिटल प्रमाणपत्राचा निर्णय घेतला आहे,’ असं ठाकूर (Anurag Thakur) ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हणाले. (Anurag Thakur)

गेल्यावर्षी २९ ऑगस्टला क्रीडा दिवस साजरा करताना ठाकूर यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. (Anurag Thakur)

(हेही वाचा – Political Party : २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ हजार ७७ कोटी; जाणून घ्या कोणत्या पक्षाची किती संपत्ती?)

डिजीलॉकरच्या माध्यमातून दिली जाणार प्रमाणपत्रे

ही डिजिटल प्रमाणपत्र त्या त्या खेळांच्या राष्ट्रीय संघटना खेळाडूंना देतील. डिजीलॉकरच्या माध्यमातून ही प्रमाणपत्रं दिली जातील. क्रीडा आणि संघटना व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही प्रमाणपत्रं ही खेळाडूंसाठी मोठी सोय असल्याचं ठाकूर (Anurag Thakur) यांनी म्हटलं आहे. ‘खेळाडूंना अगदी सहज आणि सुलभपणे आपल्या कामगिरीची नोंद एका क्लिकवर मिळू शकेल, ही प्रमाणपत्र सुरक्षित असतील आणि ती डिजिटल असल्यामुळे यात पारदर्शकपणा असेल. अशा या प्रमाणपत्रांमुळे राष्ट्रीय संघटनांचं कामही सोपं होईल. आणि खेळाडूंना कधीही ती उपलब्ध होऊ शकतील,’ असं ठाकूर याविषयी बोलताना म्हणाले. (Anurag Thakur)

त्याचबरोबर खेळांच्या राष्ट्रीय संघटनांचा कारभार सुसुत्रपणे व्हावा यासाठी क्रीडामंत्र्यांच्या हस्ते एका वेब पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं आहे. (Anurag Thakur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.