WFI Suspension : कुस्तीचा कारभार ३ सदस्यीय तात्पुरत्या समितीकडे

कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर देशातील कुस्तीचा कारभार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आता तीन सदस्यांच्या एका समितीकडे सोपवला आहे

137
WFI Suspension : कुस्तीचा कारभार ३ सदस्यीय तात्पुरत्या समितीकडे
WFI Suspension : कुस्तीचा कारभार ३ सदस्यीय तात्पुरत्या समितीकडे
  • ऋजुता लुकतुके

कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर देशातील कुस्तीचा कारभार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आता तीन सदस्यांच्या एका समितीकडे सोपवला आहे.(WFI Suspension)

भारतीय कुस्ती फेडरेशनच्या वादग्रस्त निवडणुकीनंतर क्रीडा मंत्रालयाने नवीन निवडून आलेली कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर आता देशातील कुस्तीचा कारभार पाहण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने तीन सदस्यीय तात्पुरती समिती नेमली आहे. वुशू संघटनेचे अध्यक्ष भुपेंदर बाजवा या समितीचे अध्यक्ष असतील.

समितीचे इतर दोन सदस्य आहेत माजी हॉकीपटू एम एम सोमय्या आणि माजी बॅडमिंटनपटू मनिषा कन्वर. गेल्या आठवड्यात कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका पार पडल्या. आणि यात माजी अध्यक्ष आणि सध्या खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराची तक्रार केलेले ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.(WFI Suspension)

(हेही वाचा – Fake Loan And Betting Apps : सरकारकडून बनावट कर्ज व बेटिंग अॅप्सवर बंदी; अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश)

संजय सिंग यांच्या निवडीला साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि इतरही काही खेळाडूंचा विरोध होता. शिवाय संजय सिंग यांनी नेमणूक झाल्या झाल्या दिल्लीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये परस्पर बैठक घेत काही निर्णय जाहीर केले होते.(WFI Suspension)

नवीन कार्यकारिणीने घेतलेले निर्णय योग्य पद्धतीने घेतलेले नाहीत, असा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने निवडणुकीनंतर तीन दिवसांनी ही कार्यकारिणीच बरखास्त केली होती. त्यानंतर आता तीन सदस्यीय समितीची स्थापना झाली आहे.(WFI Suspension)

(हेही वाचा – India GPT : चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता भारत जीपीटी – आकाश अंबानी)

‘नवनिर्वाचित समितीने काही निर्णय मनमानी पद्धतीने घेतले आहेत. आणि ही निर्णय पद्धती फेडरेशनच्या घटनेच्या विरोधात आहे. शिवाय एखाद्या संस्थेच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण कऱणारी ही पद्धत आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणी ताबडतोब बरखास्त करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे,’ असं २७ डिसेंबरला क्रीडा मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.(WFI Suspension)

या पत्रकात नवीन समिती स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार, ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी ही समिती स्थापन केली आहे.(WFI Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.