Priyanka Gandhi ED : आता प्रियांका गांधी देखील ईडीच्या रडारवर

जानेवारी २०२० मध्ये अटक करण्यात आलेल्या थंपीने उघडपणे ईडीला सांगितले की तो वाड्रा यांना १० वर्षांहून अधिक काळ ओळखतो आणि वाड्रा यांच्या संयुक्त अरब अमिराती तसेच दिल्लीच्या दौऱ्यांदरम्यान ते अनेक वेळा भेटले होते. ईडीने म्हटले आहे की, थंपीने हरियाणातील फरिदाबादमधील अमीपूर गावात २००५ ते २००८ या काळात ४८६ एकर जमीन खरेदी करण्यासाठी पाहवा यांच्या सेवेचा वापर केला.

153
Priyanka Gandhi ED : आता प्रियांका गांधी देखील ईडीच्या रडारवर

‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’शी संबंधित खटल्याच्या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या (Priyanka Gandhi ED) प्रियंका गांधी – वाड्रा यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. रॉबर्ट आणि प्रियंका वाड्रा यांनी दिल्लीतील रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणात जमीन खरेदी केल्याचे ईडी’ने म्हटले आहे. या एजंटने एनआरआय व्यावसायिक सीसी थंपी यांनाही जमीन विकली होती.

(हेही वाचा – Nashik Ganja seized : नाशिकमधून तब्बल ३८ लाखांचा गांजा जप्त)

अधिकृत दस्तऐवजात प्रियंका गांधी यांचे नाव –

यासंदर्भात ईडीचे म्हणणे आहे की, वाड्रा आणि थंपी यांचे जुने संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघे अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाचे कायदे आणि अधिकृत गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारी यांची अनेक एजन्सीमार्फत चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या भीतीने तो २०१६ मध्ये भारत सोडून ब्रिटनला पळून गेला होता.थंपी आणि ब्रिटिश नागरिक सुमित चड्ढा यांच्यावर भंडारीला गुन्ह्यातील रक्कम लपवण्यात मदत केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणाशी संबंधित आधीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा हे थंपीचे जवळचे सहकारी म्हणून नाव दिले आहे. मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अधिकृत दस्तऐवजात प्रियंका गांधी – वाड्रा (Priyanka Gandhi ED) यांच्या नावाचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(हेही वाचा – India GPT : चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता भारत जीपीटी – आकाश अंबानी)

एचएल पाहवा यांनी वाड्रा आणि थंपी या दोघांना जमिनी विकल्याचा आरोप तपास यंत्रणेने आरोपपत्रात केला आहे. हरियाणात जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना बेनामी पैसे देण्यात आले होते आणि वाड्रा यांनी जमीन विक्रीसाठी पूर्ण रक्कम दिली नाही. पाहवा यांनी २००६ मध्ये प्रियंका वाड्रा यांना शेतजमीन विकली आणि त्यानंतर २०१० मध्ये ती त्यांच्याकडून परत विकत घेतली. रॉबर्ट आणि प्रियांका (Priyanka Gandhi ED) यांचे नाव आरोपी म्हणून दिलेले नाही. पण थंपी आणि वाड्रा यांच्यातील संबंध दाखवण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचा उल्लेख असल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.