Ghatkopar Hoarding Accident : मनपाने झटकली जबाबदारी; लोहमार्ग पोलिसांना धरले जबाबदार

दुर्घटनाग्रस्त होर्डींगला २०२१मध्ये परवानगी देण्यात आली होती, मागील दोन वर्षात मुंबई महानगर पालिकेला हे बेकायदेशीर होर्डिंग का दिसले नाही? त्यावेळी त्यांनी लोहमार्ग पोलिसांना पत्रव्यवहार का केला नाही? असा सवाल लोहमार्ग पोलिसांकडून विचारला जात आहे.

296
BMC : महापालिकेतील कंत्राट कामांच्या शोधात काँग्रेस, केला जातो माहिती अधिकाराचा वापर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Accident) मुंबई महानगर पालिकेने मुंबई लोहमार्ग पोलिसांना जबाबदार ठरवून स्वतःवरील जबाबदारी झटकून टाकली आहे. मात्र कोसळलेल्या होर्डिंगला लोहमार्ग पोलिसांकडून संबंधित एजन्सीला देण्यात आलेले ‘ना हरकत पत्र’ २०२१ मध्ये आले होते, मागील दोन वर्षात हे बेकायदेशीर होर्डिंग महानगर पालिकेला का दिसले नाही? त्यावेळी त्यांनी लोहमार्ग पोलिसांना पत्रव्यवहार का केला नाही?, असा सवाल मुंबई लोहमार्ग पोलीस विचारत आहेत. दरम्यान घाटकोपर येथील घटना गंभीर असून या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे मुंबई लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

होर्डिंग १२० फूट लांब आणि रुंद 

घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ असणाऱ्या रेल्वे पेट्रोल पंपावर सोमवारी वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Accident) झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा बळी गेला असून जवळपास ६६ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेने होर्डिंग दुर्घटनेतून स्वतःचा बचाव करीत सर्व जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलिसांवर टाकली आहे. मुंबई महानगर पालिकेने काढलेल्या एका पत्रात असे म्हटले आहे की, ज्या जागेवर होर्डिंग उभे करण्यात आले  आहे, ती जागा लोहमार्ग पोलीस वेल्फेअरची आहे. लोहमार्ग पोलिसांनी हे होर्डिंग लावण्यासाठी जाहिरात कंपनीला एनओसी (परवानगी) दिली होती, असे महानगर पालिकेने आपल्या पत्रात म्हटले आहे. लोहमार्ग पोलीस आणि जाहिरात एजन्सीने या बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात मुंबई महानगर पालिकेची परवानगी अथवा एनओसी घेतलेली नव्हती. तसेच मनपाकडून पत्रात असेही नमूद करण्यात आले की, मुंबई महानगर पालिका जाहिरात होर्डिंगसाठी जास्तीस जास्त ४०×४० फुटाची परवानगी देते, मात्र जे होर्डिंग कोसळले आहे, ते १२०×१२० फुटाचे असून ते बेकायदेशीर असल्याचे महानगर पालिकेने म्हटले आहे.

(हेही वाचा Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट)

होर्डिंगला परवानगी कुणाच्या अखत्यारीत दिली?  

दुर्घटनाग्रस्त होर्डींगला २०२१मध्ये परवानगी देण्यात आली होती, मागील दोन वर्षात मुंबई महानगर पालिकेला हे बेकायदेशीर होर्डिंग का दिसले नाही? त्यावेळी त्यांनी लोहमार्ग पोलिसांना पत्रव्यवहार का केला नाही? असा सवाल लोहमार्ग पोलिसांकडून विचारला जात आहे. दरम्यान मुंबई लोहमार्ग पोलिस दलाचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, “घाटकोपरमधील होर्डिंग उभे असलेली जागा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नावे आहे. मी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिली होती, ती परवानगी कोणाच्या अखत्यारित देण्यात आली होती. याची अतिशय गांभीर्याने दखल घेण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे,  असे  मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.