Nashik Ganja seized : नाशिकमधून तब्बल ३८ लाखांचा गांजा जप्त

इनोव्हा गाडी नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ बेवारस स्थितीत सापडली. तेव्हा ग्रामीण पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७ लाख ,८३ हजार २५० रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला.

174
Nashik Ganja seized : नाशिकमधून तब्बल ३८ लाखांचा गांजा जप्त

नाकाबंदी दरम्यान थांबण्यास सांगूनही न थांबता पळून गेलेल्या इनोव्हा गाडीचा (Nashik Ganja seized) निफाड ते नाशिक असा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी शोध घेतला. त्यात नाशिक शहरातून गाडीसह लाखो रुपयांच्या गांजा जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७ लाख ८३ हजार २५० रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला. कारवाईत इनोव्हा गाडीसह गांजा असा एकूण ६२ लाख ९० हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अवैधरित्या गुटखा, (Nashik Ganja seized) अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत कारवाई करताना नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड तालुक्यातून नाशिककडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत व्यक्ती अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून, नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क्र. एमएच २० सीयु ७०७० थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन पळून नेले होते. या वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला. (Nashik Ganja seized)

(हेही वाचा – Fake Loan And Betting Apps : सरकारकडून बनावट कर्ज व बेटिंग अॅप्सवर बंदी; अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश)

गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

या प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाच्या मालकाचा (Nashik Ganja seized) शोध घेतला जात आहे. ही गाडी बेवारस सोडून गेल्याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाणे येथे गुरनं २७०/२०२३, एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८, (क) २० (ब) खंड २ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे., गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे हे करीत आहे. (Nashik Ganja seized)

(हेही वाचा – Zomato GST Notice : जीएसटी न भरल्याने झोमॅटोला 400 कोटींची कारणे दाखवा नोटीस)

एकूण ६२ लाख ९० हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

या वाहनाच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला आणि नाशिककडे येणारे सर्व सीसीटीव्ही तपासले या माध्यमातून वाहनाचा शोध घेतला तेव्हा ही इनोवा गाडी नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ बेवारस स्थितीत सापडली. तेव्हा ग्रामीण पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७ लाख ,८३ हजार २५० रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा (Nashik Ganja seized) मिळून आला. कारवाईत इनोव्हा गाडीसह गांजा, असा एकूण ६२ लाख ९० हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.