Fake Loan And Betting Apps : सरकारकडून बनावट कर्ज व बेटिंग अॅप्सवर बंदी; अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश

अलीकडच्या काळात बनावट कर्ज देणाऱ्या अॅप्सचे जाळे खूप पसरले आहे. अशा अॅप्सचे बळी ठरलेले लोक कर्जाच्या गर्तेत अडकतातच पण अनेक प्रकरणांमध्ये पीडितांनी आत्महत्याही केल्या आहेत. हे प्रकरण बऱ्याच काळापासून चर्चेत आहे आणि आतापर्यंत सरकारने अशा अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे.

154
Fake Loan And Betting Apps : सरकारकडून बनावट कर्ज व बेटिंग अॅप्सवर बंदी; अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश

बनावट कर्जाच्या अॅप्स आणि बेटिंग (सट्टेबाजी) अॅप्सवर (Fake Loan And Betting Apps) सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बेकायदेशीर अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश देखील केंद्र सरकारने दिले आहेत.

या अॅप्सच्या (Fake Loan And Betting Apps) संदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला केवायसी प्रक्रिया बँकांसाठी अधिक व्यापक बनवण्याची विनंती केली आहे. या प्रस्तावित केवायसी प्रक्रियेला ‘नो युवर डिजिटल फायनान्स अॅप्स’ (केव्हाडीएफए) असे नाव देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Vladimir Putin : रशियाने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; काय म्हणाले व्लादिमीर पुतीन)

सरकारने अनेक अॅप्सवर बंदी घातली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर

आम्ही बनावट कर्ज अॅप्सच्या (Fake Loan And Betting Apps) जाहिराती थांबवण्याचे काम करत आहोत. अशा बनावट कर्ज अॅप्सच्या जाहिराती अनेक प्लॅटफॉर्मवर दिसतात, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. अलीकडच्या काळात बनावट कर्ज देणाऱ्या अॅप्सचे जाळे खूप पसरले आहे. अशा अॅप्सचे बळी ठरलेले लोक कर्जाच्या गर्तेत अडकतातच पण अनेक प्रकरणांमध्ये पीडितांनी आत्महत्याही केल्या आहेत. हे प्रकरण बऱ्याच काळापासून चर्चेत आहे आणि आतापर्यंत सरकारने अशा अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे. तथापि, हे अॅप्स कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नवीन नावाने परत येतात. अशा अॅप्समध्ये, सर्वप्रथम, ग्राहकांना एका क्लिकवर आणि कागदपत्रांशिवाय कर्ज ऑफर केले जाते.

(हेही वाचा – Weather update : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! कसं असेल राज्यातील हवामान?)

बनावट कर्ज अॅप्सवर बंदी घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील

हे अॅप्स डाऊनलोड (Fake Loan And Betting Apps) होताच, कर्ज पुरवठादाराला वापरकर्त्यांचे सर्व फोटो आणि संपर्क तपशील मिळतात. मग कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांचा खरा खेळ सुरू होतो. हे बनावट अॅप्स पीडितांना लवकरात लवकर कर्ज फेडण्यासाठी सतत दबाव टाकतात. अनेक वेळा त्यांचे फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. बनावट कर्ज देणारेही पीडिताच्या फोनवरून घेतलेल्या सर्व संपर्कांशी संपर्क साधून धमकी देतात. बदनामी होण्याच्या भीतीने, वापरकर्ते कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घेतात आणि अशा प्रकारे ते कर्जाच्या जाळ्यात अडकतात. अशा बनावट कर्ज अॅप्स (Fake Loan And Betting Apps) आणि बेकायदेशीर बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.