मुंबईकरांनो सावधान! आगामी दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा

77

ऐन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात होतेय. राज्यातील पावसाचे संकट अद्याप कायम असून हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाने हजेरी लावली तर राज्यभरातही हलक्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. तर सायंकाळी मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल, असा येलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. पालघर वगळता संपूर्ण कोकणात बुधवारी अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नाशिकसह, धुळे, नंदुरबारला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसोबतच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांनाही सतर्क करण्यात आले असून ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून आज उत्तर भागात ओरेंज इशारा देखील आयएमडीकडून देण्यात आला आहे.

पोषक वातावरण निर्माण होणार

राज्यात शनिवारपर्यंत पावसाचा मुक्काम राहील. मात्र गुरुवानंतर पावसाचा जोर ब-यापैकी कमी झालेला असेल. बुधवारी अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर दक्षिण कोकणात ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. अहमदनगर, पुणे, सातारा, बीड आणि उस्मानाबादमध्येही वा-यांचा जोर वाढलेला दिसेल. मंगळवारी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या नोंदी झाल्यात. मात्र पावसाच्या प्रभावामुळे तापमानात घट झालेली नाही. बुधवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास पोषक वातावरण निर्माण होईल, असं मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातील अधिका-यांनी सांगितलं.

(हेही वाचा – लसवंत असाल तरच आता रिक्षा-टॅक्सीत मिळणार एन्ट्री!)

साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात राज्यात कडक थंडीचा प्रभाव दिसतो. मात्र अद्यापही किमान तापमान बहुतांश ठिकाणी २३ ते १८ अंशादरम्यान नोंदवलं जातंय. मुंबईतही किमान तापमानात वाढ झालीय. बुधवारी किमान तापमान २५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज आहे. यंदाच्या दिवसांत मुंबईतील किमान तापमान २० अंशाच्या आसपास अपेक्षित असल्याचंही हवामान खात्यातील अधिकारी बोलताहेत.

अवकाळी पाऊस का होतोय?

आग्नेय अरबी समुद्रापासून ते लक्षद्वीपपर्यंत वा-यांची चक्राकार स्थिती निर्माण झालीय. या स्थितीमुळे अरबी समुद्रातील पूर्व भागात महाराष्ट्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.