माथाडी कामगार चाळींतून जाणार थेट आलीशान घरांत!

87

नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांना आता अलीशान घर मिळणार आहे. त्यांच्या चाळीतील घरांच्या पुनर्विकासाला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता हा कष्टकरी कामगार वर्ग लवकरच प्रशस्त आणि अलीशान घरात प्रवेश करणार आहे. घणसोली येथील माथाडी कामगार वर्गाचे राहणीमान उंचावणार आहे, त्यांना चाळीतून थेट 40 मजल्याच्या टॅावरमध्ये घर मिळणार आहे. त्यामुळे आता माथाडी कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

40 मजल्यांचं टोलेजंग टॅावर उभारणार 

सिम्प्लॅक्स कॅालनीमधील सहा सोसायट्यांनी एकत्रीतपणे या पुनर्विकासाला पसंती दिली आहे. त्यामध्ये 3 हजार 200 घरांची संख्या असून सर्वच सोसायटीमधील रहिवाशांनी खाजगी बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकासाला हिरवा कंदील दिल्याने कायदेशीर परवानगीला सुरुवात झाली आहे. या सहा सोसायट्यांच्या जागेत पुनर्विकासामुळे टोलेजंग 40 मजल्यांचं टॅावर उभा राहणार आहे. या टॅावरमध्ये 450 चौरस फूटापेक्षा जास्त जागेचे घर माथाडी कामगारांना मिळणार आहे. यामध्ये दीड ते दोन बीएचकेचा समावेश आहे.

माथाडी कामगार वर्गांत आनंदाचे वातावरण 

सरकारकडून माथाडी कामगारांच्या घरांसाठी ज्या कायदेशीर परवानग्या द्यायच्या आहेत त्याबाबत सर्व मदत करणार असल्याचे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडाचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी माथाडी कामगारांना सांगितले आहे. मोठ्या घरात आता एकत्र कुटुंबासहित राहता येणार असल्याने माथाडी कुटुंबांत आनंदाचे वातावरण आहे.

 (हेही वाचा : पेट्रोल डिझेलमधून केंद्र सरकार मालामाल! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.