Tina Munim Ambani : जाणून घ्या बॉलिवुड अभिनेत्री आणि अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना मुनीम अंबानी यांच्याबद्दल

टीना मुनीम अंबानी यांनी आपली हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द देव आनंद यांच्या 'देस परदेस' या चित्रपटाद्वारे केली. पुढे देव आनंदसोबत त्यांनी 'लुटमार' आणि 'मन पसंद' नावाचे चित्रपटही केले.

1937
Tina Munim Ambani : जाणून घ्या बॉलिवुड अभिनेत्री आणि अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना मुनीम अंबानी यांच्याबद्दल

टीना मुनीम (Tina Munim Ambani) यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९५७ साली झाला. त्यांनी आपले ग्रॅज्युएशन मुंबईत खार इथल्या एम.एम. प्युपिल्स ओव्न स्कूलमधून १९७५ साली पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांनी अरुबा येथे मिस टीनेज इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांना फेमिना टीन प्रिन्सेस, इंडिया हा उपविजेतेपदाचा क्राऊन देण्यात आला. त्यानंतर टीना यांनी जय हिंद कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. एक आघाडीची अभिनेत्री म्हणून जवळजवळ १३ वर्षे त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवली.

(हेही वाचा – Virat Kohli : रवी शास्त्रींना विराट कोहलीचा कुठला गुण आवडतो?)

२ फेब्रुवारी १९९१ साली त्यांनी अनिल अंबानी यांच्याशी विवाह केला. अनिल अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणारे प्रसिध्द भारतीय उद्योजक धीरूभाई अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आहेत. या दांपत्याला जय अनमोल आणि जय अंशुल नावाची दोन मुले आहेत. त्यांपैकी मोठ्या मुलाचे लग्न क्रिशा शाह हिच्यासोबत २० फेब्रुवारी २०२२ साली झाले आहे. टीना मुनीम (Tina Munim Ambani) यांचे मोठे दीर मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत.

(हेही वाचा – Thomas Edison : जाणून घ्या पहिला बल्ब निर्माण करणाऱ्या थॉमस एडिसन यांच्याबद्दल)

‘देस परदेस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण –

टीना मुनीम अंबानी (Tina Munim Ambani) यांनी आपली हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ या चित्रपटाद्वारे केली. पुढे देव आनंदसोबत त्यांनी ‘लुटमार’ आणि ‘मन पसंद’ नावाचे चित्रपटही केले. त्याकाळी देव आनंद हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. तसेच बासू चॅटर्जी यांच्या ‘बातों बातों में’ नावाच्या चित्रपटात त्यांनी अमोल पालेकर यांच्यासोबत काम केले होते.

‘जिगरवाला’ चित्रपट हा त्यांचा शेवटचा चित्रपट

प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘कर्ज’ आणि ‘ये वादा रहा’ या चित्रपटांत त्यांनी काम केले होते. तसेच त्याकाळचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत टीना मुनीम (Tina Munim Ambani) यांनी ‘फिफ्टी फिफ्टी’, ‘सौतन’, ‘बेवफाई’, ‘सुराग’, ‘इंसाफ मै करूंगा’, ‘राजपूत’, ‘आखीर क्यों?’, ‘पापी पेट का सवाल’, ‘अलग-अलग’, ‘भगवान दादा’ आणि ‘अधिकार’ अशा कितीतरी चित्रपटांत काम केले होते. १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘जिगरवाला’ नावाचा चित्रपट हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

(हेही वाचा – Acharya Pramod Krishnam : शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, कॉंग्रेस कडून आचार्य प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी)

मला कधीही पश्चात्ताप झाला नाही –

प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत टीना मुनीम (Tina Munim Ambani) म्हणाल्या होत्या, “कधीकधी मला वाटतं की, मी खूप लवकर चित्रपटात काम करणं सोडून दिलं. पण नंतर मला समजलं की, या जगात एक्सप्लोर करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी मला हवं असलेलं आणखी बरंच काही आहे. फक्त चित्रपटांना चिकटून मी राहू शकत नाही. तेव्हा मी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या या निर्णयाचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही.”

(हेही वाचा – Bharat Ratna : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी)

हार्मनी आर्ट फाऊंडेशनची सुरुवात –

नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळायला हवे म्हणून टीना अंबानी (Tina Munim Ambani) यांनी कलाक्षेत्रातल्या अनुभवी मान्यवरांच्या मदतीने १९९५ साली पहिला हार्मनी आर्ट शो आयोजित केला होता. पुढे २००८ साली हार्मनी आर्ट फाऊंडेशनने लंडनमधल्या क्रिस्टीज येथे नवोदित भारतीय कलाकारांना एकत्रित केलं आणि आपल्या भारतातील कलेच्या प्रतिभेकडे जगाचे लक्ष वेधले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.