मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते संजय नगर बिट चौकीचे झाले लोकार्पण

144

नागरिकांच्या रक्षणासाठी व गुन्हेगारी रोखण्यासाठी उपयुक्त अशा बिट चौक्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असतात. कुर्ला संजय नगरमध्ये बिट चौकीची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार दिलीप लांडे यांनी बिट चौकी उभारणी केली. या बिट चौकीचे आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी मुंबई पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांची उदघाटने केली. घाटकोपरच्या संजय नगर या अतिशय डोंगराळ आणि दाट झोपडपट्टी असलेल्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात सुसज्ज अशी भव्य पोलीस बिट चौकी आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि घाटकोपर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद नेर्लेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( हेही वाचा : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन)

ही वास्तू म्हणजे पोलीस, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहकार्याचे प्रतीक आहे. याठिकाणी लोकांना योग्य सेवा दिली जाईल आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली हे चांगले कार्य केले आहे. आम्ही जास्तीत जास्त पोलिसांच्या सुखसुविधांसाठी काम करणार आहोत, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली. नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरच साकीनाका आणि घाटकोपरच्या मध्यभागी नवीन पोलीस ठाणे तयार करणार असल्याचे आणि साकीनाका पोलीस ठाण्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.