Pondicherry Hotels Near Beach : पाँडिचेरीमधील टॉप हॉटेल्स शोधताय, तर इथे क्लिक करा!

रु डे ला मरीन येथे स्थित श्री अरबिंदो आश्रम हे भारतातील सर्वात महत्वाचे आश्रम आहे. या आश्रमाची स्थापना स्वातंत्र्यसेनानी आणि अध्यात्मिक तत्वज्ञानी श्री अरबिंदो यांनी केली होती.

140
Pondicherry Hotels Near Beach : पाँडिचेरीमधील टॉप हॉटेल्स शोधताय, तर इथे क्लिक करा!

भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे पाँडिचेरी… (Pondicherry) या शहरात अनेक इमारती, चर्च, मंदिरे आणि पुतळे आहेत जे, जुन्या पद्धतीच्या शहरांची ओळख करुन देतात आणि फ्रेंच शैलीतील बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे, समुद्र… पाँडिचेरीला (Pondicherry) आता वालुकामय समुद्रकिनारे नसले तरी पर्यटकांना आजही समुद्राचे आकर्षण आहे. (Pondicherry Hotels Near Beach)

रु डे ला मरीन येथे स्थित श्री अरबिंदो आश्रम हे भारतातील सर्वात महत्वाचे आश्रम आहे. या आश्रमाची स्थापना स्वातंत्र्यसेनानी आणि अध्यात्मिक तत्वज्ञानी श्री अरबिंदो यांनी केली होती. ऑरोविल (सिटी ऑफ डॉऊन) हे पाँडिचेरीच्या वायव्येस ८ किमी (५.० मैल) अंतरावर स्थित एक “एक्सपिरिमेंटल” टाउनशिप आहे. (Pondicherry Hotels Near Beach)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी सर्व संत एका व्यासपीठावर येणार; संघाने आखली योजना)

त्याचबरोबर पाँडिचेरीमध्ये (Pondicherry) अनेक जुनी आणि मोठे चर्च आहेत, त्यापैकी अनेक इमारती बहुतेक १८व्या आणि १९व्या शतकात बांधली गेली आहेत. चिल्ड्रन्स पार्क आणि डुप्लेक्स पुतळा, गांधी पुतळा, नेहरू पुतळा, ले कॅफे, फ्रेंच वॉर मेमोरियल, १९ व्या शतकातील लाइट हाऊस, भारती पार्क, गव्हर्नर्स पॅलेस, रोमेन रोलँड लायब्ररी, यासारख्या अनेक वास्तू पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. तसेच विधान सभा, पाँडिचेरी म्युझियम आणि सेंट लुईस स्ट्रीट येथील फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पाँडिचेरी हा वास्तू तुम्ही पाहायलाच हव्यात. (Pondicherry Hotels Near Beach)

मात्र तुम्हाला प्रश्न पडला असे की आता पाँडिचेरीमध्ये (Pondicherry) राहायची सोय कशी करायची. तर आम्ही तुम्हाला पाँडिचेरीममधल्या टॉप हॉटेल्सची माहिती देणार आहोत (Pondicherry Hotels Near Beach):

(हेही वाचा – Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची १० वैशिष्ट्ये)

पाँडिचेरीमधील टॉप ५ हॉटेल्स पुढीलप्रमाणे, 

१. व्हिला शांती

१२ रुइ सफ्रेन स्ट्रीट, पाँडिचेरी ६०५००१.
फोन : 0413 420 0028

जुन्या फ्रेंच शहराच्या परिसरात, बाजाराजवळ, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर, समुद्रकिनारी आणि अरबिंदो आश्रमाच्या अगदी जवळ असलेल्या, या जुन्या १९व्या शतकातील हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले आहे… ही वास्तू खूप सुंदर पद्धतीने बांधण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे राहायला नक्कीच आवडेल. (Pondicherry Hotels Near Beach)

२. द प्रोमेनेड

२३ गौबर्ट एव्हेन्यू, गांधी पुतळ्यासमोर, बीच रोड, पाँडिचेरी ६०५००१.

अतिशय प्रशस्थ हॉटेलमध्ये राहायचे असेल तर ’द प्रोमेनेड’ या हॉटेलचा पर्याय निवडणे कधीही श्रेयस्कर आहे. बीच जवळ असलेले आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणारे हे हॉटेल म्हणजे पर्यटकांची पहिली पसंती आहे. कधी पाँडिचेरी (Pondicherry) आलात तर हा पर्याय निवडायला विसरु नका. (Pondicherry Hotels Near Beach)

३. रॅडिसन रिसॉर्ट पाँडिचेरी बे

मानाव्हॅली रेव्हेन्यू व्हिलेज, पाँडिचेरी – ६०५००७
फोन : 0413 260 3200
वेबसाईट : https://www.radissonhotels.com

रॅडिसन रिसॉर्ट पाँडिचेरी बे भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील लहान पण पाँडिचेरीची संस्कृती दर्शवणार्‍या गावात स्थित आहे. सरोवर आणि लोकप्रिय पॅराडाईज बीच यांमध्ये वसलेले रिसॉर्ट – म्हणजे निसर्गाला गवसणी घालणारे स्वर्गच जणू. या हॉटेलमध्ये रहा आणि एक वेगळीच अनुभूती अनुभवा… (Pondicherry Hotels Near Beach)

४. आनंधा इन

१५४, पटेल सलाई, पाँडिचेरी – ६०५००१

Anandha Inn Convention Center and Suites हे शहराच्या मध्यभागी असलेले ४ स्टार हॉटेल आहे. समुद्रकिनार्‍यापासून आणि श्री अरबिंदो आश्रममापासून १० मिनिटांच्या अंतरावर… तसेच सर्व महत्वाच्या स्थळांना भेट देण्यासाठी एक उत्तम गंतव्य आहे. वातानुकूलित खोल्या, मिनीबार, कॉफी किटली, इलेक्ट्रॉनिक की कार्ड लॉक, सुरक्षित लॉक, एलसीडी टीव्ही, वन टच टेलिफोन, मोफत वाय-फाय इंटरनेट, सॉफ्ट कम्फर्ट पिलो, हेल्थ क्लब, आयुर्वेदिक अशा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. (Pondicherry Hotels Near Beach)

५. ऑरा हॉटेल

२२६ मिशन, सेंट एमजी रोड, पाँडिचेरीच ६०५००१

हॉटेल ऑरा – पाँडिचेरीमधील (Pondicherry) हे डिझायनर्स प्राईड बुटीक हॉटेल आहे, ज्यामध्ये १५ डिलक्स खोल्या आहेत आणि एक खास रेस्टॉरंट आहे ज्यामध्ये मोफत नाश्ता दिला जातो. अरबिंदो आश्रम, बीच आणि इतर महत्वाच्या ठिकाणांपासून अगदी जवळ असलेले हे हॉटेल तुमचं लक्ष वेधून घेते आणि तुम्हाला आरामदायक अनुभव देते. (Pondicherry Hotels Near Beach)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.