Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी सर्व संत एका व्यासपीठावर येणार; संघाने आखली योजना

या कार्यक्रमांमध्ये क्षेत्रीय साधू संतसोबत आचार्य महामंडलेश्वर अवेशानंद गिरी, बाबा रामदेव, पंडित प्रदीप मिश्रा, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रीही सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील शहरी आणि ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीपूर्वी संत समागमाची ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

247
Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी सर्व संत एका व्यासपीठावर येणार; संघाने आखली योजना
  • वंदना बर्वे

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) हिंदू मतांची वज्रमूठ बांधण्यासाठी संघाने एक रणनीती तयार केली आहे. सर्व धर्म संप्रदायतील साधू संतांना एका व्यासपीठावर आणण्याची योजना आहे. मध्य प्रदेशात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी काम करण्याचा रोडमॅप तयार केला आहे. यासाठी सर्व जाती-पंथांना जवळ आणण्यासाठी त्यांच्या संत, धर्मगुरूंना एका व्यासपीठावर बोलावून सामाजिक समरसतेचे कार्यक्रम जोरात आयोजित केले जाणार आहेत. बसंत पंचमीपासून सर्व राज्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. (Lok Sabha Elections)

या कार्यक्रमांमध्ये क्षेत्रीय साधू संतसोबत आचार्य महामंडलेश्वर अवेशानंद गिरी, बाबा रामदेव, पंडित प्रदीप मिश्रा, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रीही सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील शहरी आणि ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) संत समागमाची ही योजना अंमलात आणली जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) अभिषेकनंतर देशभरात निर्माण झालेले हिंदू ऐक्याचे वातावरण जिवंत ठेवण्यासाठी संत समागमाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी गावोगावी लोकांना अयोध्येला घेऊन जाण्याचा कार्यक्रम विविध सामाजिक संस्थांकडून सुरू करण्यात आला आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Pushkar Singh Dhami : हल्द्वानीमध्ये अतिक्रमण पाडलेल्या जागी पोलीस ठाणे बांधणार; पुष्कर सिंह धामी काय म्हणाले…)

आता या संत संमेलनासारख्या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा त्या त्या समाजाच्या संस्थाकडून केले जाणार आहेत. पण संघ पडद्याआड राहील. अयोध्या कार सेवेसाठी हिंदू समाज ज्या प्रकारे जात-पात विसरून एकत्र आला होता, तीच भावना लोकांमध्ये पुन्हा जागृत झाली पाहिजे, अशी चर्चा या वेळी संघाच्या समन्वय बैठकीत झाली. यासाठी संघ एक विहीर, एक मंदिर, एक स्मशानभूमी असे कार्यक्रमही राबवत आहे. तर दुसरीकडे काशी-मथुराबाबत न्यायालयाच्या निर्णयामुळे वातावरण तापू लागले आहे. समान नागरी संहिता यासारख्या मुद्द्यांवर संघाच्या स्पष्ट सूचनेनंतर उत्तराखंडसह भाजपच्या इतर राज्यांनीही या दिशेने काम सुरू केले आहे. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.