Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची १० वैशिष्ट्ये

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केलेल्या नवीन व्हिडिओतून देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती मिळते. 

179
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची १० वैशिष्ट्ये
  • ऋजुता लुकतुके

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सोमवारी आपल्या ट्विटर खात्यावरून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पाचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओला त्यांनी ‘मोदी ३.० मध्ये बुलेट ट्रेनसाठी तयार राहा,’ असा मथळा दिला आहे. थोडक्यात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तिसऱ्या कार्यकाळात बुलेट ट्रेन प्रकल्प देशाच्या सेवेत रुजू होईल अशी जाहिरातच भाजपच्या (BJP) या मंत्र्यांना करायची आहे. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

नोव्हेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं. जवळ जवळ ४०० किमी प्रती तास वेगाने ही ट्रेन धावणार असल्यामुळे त्यासाठी वेगळे ट्रॅक उभारावे लागणार आहेत. आणि हे काम नियमित वेगाने सुरू आहे. बिलिमोरा ते सुरत दरम्यानचा ५० किमींचा टप्पा ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. आता नवीन व्हिडिओतून या प्रकल्पाबद्दल आणखी माहिती मिळत आहे. ती जाणून घेण्यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी (Ashwini Vaishnav) ट्विट केलेला व्हिडिओ पाहूया, (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर दिवसाला ७० फेऱ्या होणार आहेत. आणि एका वर्षांत १.६ कोटी लोक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. २०५० पर्यंत फेऱ्यांची संख्या वाढवून १०५ इतकी करण्यात येणार आहे. फक्त हा एकच प्रकल्प नाही तर दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते कोलकाता आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांवरही अतीवेगवान रेल्वे सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी (Ashwini Vaishnav) अलीकडेच राज्यसभेत सांगितलं होतं. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी सर्व संत एका व्यासपीठावर येणार; संघाने आखली योजना)

मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गाची १० वैशिष्ट्ये,
  • मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचं ५०६ किलोमीटरचं अंतर ही ट्रेन २ तासांत कापणार आहे. गाडीचा सर्वाधिक वेग ३२० किमी प्रती तास इतका असेल. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)
  • मुंबईला गुजरात राज्याशी जोडताना प्रवासाचा वेळ ६ तासांनी कमी होणार आहे.
  • या मार्गावर नेहमीसारखे रेल्वे रुळ नसतील तर स्लॅब ट्रॅक बसवण्यात येणार आहेत. भारतात असे रुळ पहिल्यांदाच बसवले जात आहेत.
  • रेल्वे गाड्यांमध्ये बसवलेल्या यंत्रणेला भूकंपाचा अंदाज सगळ्यात आधी येईल. जमिनीतील कंपनांवरून ही रेल्वे भूकंपाचा अनुमान व्यक्त करू शकेल.
  • या मार्गावर २४ नद्यांवरील पूल, २८ पोलादाचे पूल आणि ७ मोठे बोगदे असणार आहेत.
  • या मार्गावर ७ किलोमीटर लांबीचा समुद्राखालून जाणारा बोगदाही असेल. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)
  • मार्गावरील १२ रेल्वे स्टेशन ही अत्याधुनिक आणि अद्ययावत असतील.
  • व्हिडिओत या प्रकल्पाला ‘अभियांत्रिकी चमत्कार’ तसंच ‘भारतीय भविष्याचा चेहरा’ असं संबोधण्यात आलं आहे.
  • प्रकल्पासाठीचा खर्च १.०८ लाख कोटी रुपये इतका आहे. यातील १०,००० कोटी केंद्र सरकार तर प्रत्येकी ५,००० कोटी रुपयांचा भार दोन्ही राज्य सरकार उचलणार आहेत.
  • प्रकल्पासाठीचे उर्वरित पैसे जपानकडून कर्जाऊ घेतले जाणार आहेत. यासाठीचं कर्ज ०.१ टक्के व्याजाने देण्याचं जपानने कबूल केलं आहे. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.