नाशिक : पोस्टरवर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख; हिंदू समाजाला चिथवण्याचा प्रयत्न

मुघलकाळात नाशिक शहराचं नाव गुलशनाबाद असं होतं.

176
नाशिक : पोस्टरवर नाशिकचा 'गुलशनाबाद' असा उल्लेख; हिंदू समाजाला चिथवण्याचा प्रयत्न

सध्या देशातील शहरांचे आणि वेगवेगळ्या वास्तूंचे नामांतर होत असतांना नाशिकमधील एका पोस्टरने आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. काल म्हणजेच २९ जून रोजी बकरी ईदच्या निमित्ताने नाशिक शहरात एक पोस्टर झळकले. मात्र त्या पोस्टरवर नाशिक शहराचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – मुंबईत धावत्या लोकलमध्ये पुन्हा तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल)

मुघलकाळात नाशिक शहराचं नाव गुलशनाबाद असं होतं. त्यानंतर पेशवाईच्या काळात गुलशनाबादचं नामकरण नाशिक असं करण्यात आलं. मात्र त्यानंतर आता अचानक नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद करण्यात आल्याने संपूर्ण शहरात गोंधळ उडाला. तसेच पुन्हा एकदा नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद म्हणून केल्याने राज्यात पुन्हा एकदा मुघल साम्राज्य आणण्याचा हा घाट आहे का? असा सवाल उपस्थित करत सोशल मीडियावर या पोस्टरला विरोध होत आहे. दरम्यान नाशिकचा गुलशनाबाद उल्लेख केल्याने हा समस्त हिंदू समाजाला चिथवण्याचा प्रयत्न आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान दुसरीकडे सोलापूरमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. गुरुवारी सोलापूरमधील ईदगाह मैदानावर फुगे विक्रेत्या जवळ आय लव्ह पाकिस्तान लिहिलेले फुगे आढळले. यानंतर एकच खळबळ उडाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.