मुंबईकरांच्या पाण्याच्या पातळीने गाठली उंची, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साठा वाढला

मोडकसागर धरणाच्या परिसरात आतापर्यंत ६६६ मि मी एवढा पाऊस पडला असून त्या खालोखाल तानसा आणि भातसामध्ये पाऊस पडला आहे.

246
मुंबईकरांच्या पाण्याच्या पातळीने गाठली उंची, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साठा वाढला

मागील शनिवारपासून (२४ जून) आगमन झालेल्या पावसामुळे आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये समाधानकारक वाढ होतांना दिसत आहे. २६ जून २०२३ रोजी या सर्व धरणांमध्ये नियमित पाणी साठ्यासोबत राखीव साठा अशाप्रकारे एकूण पाणी साठ्याची पातळी १२.११ टक्क्यांवर आली होती, ती पाण्याची पातळी ३० जून २०२३ च्या सकाळी १६.५५ टक्के एवढी झाली. त्यामुळे चार दिवसांमध्ये चार टक्के एवढा पाणी साठा वाढलेला असून राखीव साठा वगळता नियमित पाणी साठा हा १०.८८ टक्के एवढा आहे. त्यामुळे ३० जूनच्या मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणी साठा अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही थोडीफार समाधानाची बाब आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावांमधून दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासर्व या तलावांमधील नियमित पाणी साठा हा ७ टक्क्यांपर्यंत आला होता. नियमित पाणी साठ्यातील पाणी उपलब्ध असल्याने महापालिकेला भातसाच्या राखीव पाणी साठ्याला हात लावण्याची गरज भासली नाही. मात्र, शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता तलाव तथा धरण क्षेत्रांमध्ये चांगल्याप्रकारे पावसाची हजेरी लागली आहे.

(हेही वाचा – मुंबईत धावत्या लोकलमध्ये पुन्हा तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल)

मोडकसागर धरणाच्या परिसरात आतापर्यंत ६६६ मि मी एवढा पाऊस पडला असून त्या खालोखाल तानसा आणि भातसामध्ये पाऊस पडला आहे. दोन्ही धरणांमध्ये अनुक्रमे ४८९ मि मी आणि ४३८ मि मी एवढा पाऊस पडला आहे.

मुंबईला वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. त्यातुलनेत ३० जून पर्यंत यासर्व धरणांमध्ये १ लाख ५७ हजार ४१२ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा निर्माण झाला आहे, जो याच दिवशी मागील वर्षी १ लाख ५२ हजार १५३ दशलक्ष लिटर एवढा होता, तर ३० जून २०२१ हा पाणी साठा २ लाख ५७ हजार ८३४ दशलक्ष लिटर एवढा होता. त्यामुळे नियमित पाणी साठा हा १०. ८८ टक्के एवढा जमा झाला आहे. भातसामध्ये १०० टक्के साठा आणि इतर धरण आणि तलावांमधील राखीव साठा ४२.६३ टक्के एवढा आहे.

मागील तीन वर्षांमध्ये अशाप्रकारे राहिली होती पाण्याची पातळी

३०जून २०२३ : १ लाख ५७ हजार ४१२ दशलक्ष लिटर १०.८८ टक्के)

३० जून २०२२ : लाख ५२ हजार १५३ दशलक्ष लिटर( १०.५१टक्के)

३० जून २०२१ : २ लाख ५७ हजार ८३४ दशलक्ष लिटर( १७.८१ टक्के)

अशा प्रकारे वाढतेय पाण्याची पातळी

३० जून २०२३ : एकूण पाणी साठा १६.५५ टक्के

२७ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.२५ टक्के

२६ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.०२ टक्के

२५ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.११ टक्के

२४ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.३९ टक्के

२३ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२. ७३ टक्के

२१ जून २०२३ : एकूण पाणी साठा १३.३८ टक्के

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.