ठाकरे गटाला पुन्हा झटका; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तिय जाणार शिंदे गटात

198
ठाकरे गटाला पुन्हा झटका; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तिय जाणार शिंदे गटात

आज म्हणजेच शुक्रवार ३० जून रोजी शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद हा काही नवीन विषय नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाला अनेक झटके बसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तिय राहुल कनाल उद्या शनिवार, १ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणारा आहेत तर दुसरीकडे त्यांचा निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करनार आहे. राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीर रित्या जय महाराष्ट्र करत असल्याचंही राहुल कनाल यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – नाशिक : पोस्टरवर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख; हिंदू समाजाला चिथवण्याचा प्रयत्न)

राहुल कनाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “दुःख होतंय!!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलंय. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है!!!”

राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे.

या सर्व प्रकारावरून राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.