ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा वापर? भाजपाच्या Chitra Wagh यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

236
ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा वापर? भाजपाच्या Chitra Wagh यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

राज्यभरात लोकसभा २०२४ च्या निवडणुकीनची (Lok Sabha Election 2024) तयारी चालू असताना, सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. उबाठा गटाच्या (UBT) जाहिरातीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. (Chitra Wagh)

दरम्यान, गुरुवारी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदमध्ये उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. शिवसेना उबाठा गटाने निवडणूक प्रचारासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीतील कलाकार हा पॉर्न स्टार (Porn Star) आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून, त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर (Women’s oppression) जाहिरात कशी केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उबाठा गटावर केला.  (Chitra Wagh)

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

चित्रा वाघ म्हणाल्या की, या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. ‘आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी (Aaditya Thakeray Night Life) आग्रह धरला’ होता. आता, ‘त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती’ रुजवायची आहे का, असा सवाल त्यांनी केला. एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का, असा प्रश्नही त्याने केला. जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास करायला हवा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. (Chitra Wagh)

ही जाहिरात करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे? कंपनीचा आणि या पॉर्न स्टारचा संबंध काय आहे ? या जाहिरात कंपणीचे आणि उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काय संबंध आहेत का ? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. तसेच यासंबंधीचा तपास व्हायला पाहिजे असेही चित्रा यांनी म्हटले.  

(हेही वाचा – Ramdas Athawale: मावळच्या प्रचारसभेत रामदास आठवलेंनी कवितेमधुन केली तुफान फटकेबाजी!)  

नेमकं प्रकरण काय ?

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या जाहिरात तयार केल्या आहेत. यामध्ये एका जाहिरातीमध्ये सरकारला महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील कलाकारावर आक्षेप घेत आता भाजपाने शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला आहे. (Chitra Wagh)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.