Ramdas Athawale: मावळच्या प्रचारसभेत रामदास आठवलेंनी कवितेमधुन केली तुफान फटकेबाजी!

140
Ramdas Athawale: मावळच्या प्रचारसभेत रामदास आठवलेंनी कवितेमधुन केली तुफान फटकेबाजी!
Ramdas Athawale: मावळच्या प्रचारसभेत रामदास आठवलेंनी कवितेमधुन केली तुफान फटकेबाजी!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) त्यांच्या शैलीतच प्रचारात रंगत आणताना दिसत आहेत. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या (Srirang Barne) प्रचारार्थ सादर केलेल्या कविता ऐकून उपस्थितांनी आठवलेंना दाद दिली. हरणे, बारणे अन् कारणे या शब्दांचं यमक जुळवून बारणेंच्या विजयाचा संकल्प आठवलेंनी केला. तर नारा, सारा, तारा अन् बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसचे कसे वाजवणार बारा हे ही आठवलेंनी कवितेतून सादर केलं. (Ramdas Athawale)

(हेही वाचा –Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आहे म्हणत त्यांच्या (Ramdas Athawale) खास शैलीत कविता सादर केली. ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे, नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर आहेत अनेक कारणे, का निवडून येणार नाहीत आप्पा बारणे, असे यमक त्यांनी जुळवले. नारा, सारा, तारा अन बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसला या निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्यांवरील त्यांच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. (Ramdas Athawale)

(हेही वाचा –Raj Thackeray: श्रीकांत शिंदेंसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरेंची कल्याणमध्ये सभा)

“सभास्थळी महिलांची उपस्थिती जास्त आहे, महिलाच पुरुषांपेक्षा जास्त हुशार असतात, महिला ऍक्टिव्ह असतात, कुटुंब सांभाळतात, मुलाला सांभाळणं सोप आहे, पण नवऱ्याला सांभाळणं अवघड आहे. मोदींना हरवणे सोपं काम नाही, त्यांच्या पाठीशी देशातील महिला आहेत. महिलांना लोकसभेत, विधानसभेत आरक्षण दिल. सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो. अनेक जण विचारतायत तुम्हाला तिकीट मिळालं नाही, माझी 2024 राज्यसभा आहे, नंतर मला राज्यसभा मिळेल याची कल्पना आहे. एखादी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. तिकीट मिळालं नाही. तरीही माझा पक्ष काम करत आहे.” असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.