Madha Lok sabha Election: शरद पवारांना धक्का! अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा जाहीर

150
Madha Lok sabha Election: शरद पवारांना धक्का! अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा जाहीर
Madha Lok sabha Election: शरद पवारांना धक्का! अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीनंतर (Madha Lok sabha Election) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी आता भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार आणि मोहिते पाटलांसाठी हा धक्का मानला जात आहे. दिवसभर चाललेल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी संपूर्ण विठ्ठल परिवार भाजपच्या मागे ताकदीने उभा राहणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. (Madha Lok sabha Election)

२०२१ पासून शिखर बँकेची कारवाई सुरु

चार दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने पूर्वीच्या 442 कोटी रुपये कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या कारखान्यावर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे 2021 पासून शिखर बँकेची कारवाई सुरु असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. फडणवीस यांनी तातडीने दिलासा देऊन कारखान्याला जीवनदान दिल्याने आम्ही कारखान्यासाठी हा निर्णय घेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते याना पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. (Madha Lok sabha Election)

शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख

अभिजित पाटील हे राष्ट्रवादी फुटल्यापासून शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते . विठ्ठल कारखाना आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघातील एक मोठी ताकद म्हणून अभिजित पाटील यांची ओळख आहे. अभिजित पाटील यांचा एक कारखाना सांगोला येथेही असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात खूप मोठी मतांची ताकद भाजपाला होणार आहे. याचसोबत पंढरपूर आणि मंगळवेढ्यात असणारे पाटील यांचे हजारो कार्यकर्ते आता राम सातपुते यांचा प्रचार करणार आहेत. (Madha Lok sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.