Amethi-Raibare Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला अमेठी-रायबरेलीतून पराभवाची भीती

135
Amethi-Raibare Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला अमेठी-रायबरेलीतून पराभवाची भीती
Amethi-Raibare Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला अमेठी-रायबरेलीतून पराभवाची भीती

गांधी—नेहरूच्या काळापासून कॉंग्रेसचा गड मानले जाणारे अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना कॉंग्रेस (Congress) नेतृत्वाला घाम फुटला आहे. भाजपाने (BJP) अमेठीतून स्मृती इराणी यांना मैदानात उतरविले आहे. तर, रायबरेलीतही कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपा (BJP) आतुर आहे. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Virat Kohli on Anushka : पत्नी अनुष्काच्या वाढदिवशी विराटचा भावपूर्ण संदेश )

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला आपल्याच पारंपारिक मतदारसंघात योग्य उमेदवार मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे. अमेठी आणि रायबरेली हा कॉंग्रेसचा पारंपारिक गड. परंतु, या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक कोण लढणार? याचा कॉंग्रेसला अद्याप निर्णय घेता आलेला नाही. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात निवडणूक आहे. तर, 3 मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज भरायला केवळ एक दिवस उरला आहे. परंतु, कॉंग्रेसने (Congress) या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Raj Thackeray: श्रीकांत शिंदेंसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरेंची कल्याणमध्ये सभा)

राहुल अमेठीतून निवडणूक लढवू शकतात
भाजपाच्या (BJP) स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. आता भाजपाचे लक्ष्य रायबरेलीवर आहे. येथूनही काँग्रेसला (Congress) पराभूत करण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. याच कारणामुळे काँग्रेस पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी वायनाडमधून मैदानात उतरले आहेत. येथील निवडणूक झाली आहे. आता ते अमेठीमधून लढू शकतात, अशी चर्चा आहे. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

प्रियांका रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे
प्रियंका गांधी—वाड्रा यांनाही रायबरेलीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. इंडी आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसला राहुल गांधी यांना अमेठीतून आणि प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी देण्याचा सल्ला दिला आहे. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीची रवी शास्त्रीकडून पाठराखण )

मल्लिकार्जुन खर्गे आपल्या मतावर ठाम

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन (mallikarjun kharge) यांनी या दोन्ही मतदारसंघातून गांधी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे मत बनविले आहे. राहुल आणि प्रियंका अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसले तरी खर्गे यांनी त्यांच्यापैकी किमान एकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष समितीच्या बैठकीतही, काँग्रेसच्या यूपी युनिटने औपचारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठी आणि रायबरेलीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मांडला आणि या प्रकरणाचा अंतिम निर्णय खर्गे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. (Amethi-Raibare Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.